शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला डोक्यात दगड घालून संपवले, खुनातील आरोपी गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 19:09 IST

चिंचवड, विद्यानगर येथे २५ सप्टेंबरला इम्रान मुसा शेख (वय २५) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पिंपरी - चिंचवड, विद्यानगर येथे २५ सप्टेंबरला इम्रान मुसा शेख (वय २५) याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातील संशयित आरोपी सूरज नवनाथ कांबळे (वय २२) याच्याकडे चौकशी केली असता, मृत्यूपुर्वी इम्रानने आपणास दस-याला जीवे मारणार अशी धमकी दिली होती, त्याच्याकडून धोका आहे हे लक्षात घेऊन साथीदारांच्या मदतीने इम्रानचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित चार अल्पवयीन आहेत. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी विद्यानगर येथील खून प्रकरणातील आरोपींना पकडल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, सूरज नवनाथ कांबळे (वय २२, विद्यानगर),आकाश तुकराम तरस (वय १९,रा.रामनगर),ओंकार ब्रम्हदेव राजगुरू (वय १९ बालाजीनगर, भोसरी) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर चार अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. 

याबबतची सविस्तर माहिती अशी, आरोपी झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड, सिमेंट ब्लॉक घालून त्याचा खून केल्याचे दिसून आले. परंतू खुनाचे कारण आणि आरोपी कोण असावेत? याचा शोध घेणे कठीण होते. पोलिसांनी विद्यानगर परिसरात चौकशी केली. संशयित आरोपी सूरज पोलिसांना संशयितरित्या वावरताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच भागातील मुलाशी त्याची काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती असे तो सांगू लागला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दीड महिन्यापुर्वी भावाबरोबर इम्रानचे भांडण झाले होते. २३ सप्टेंबरला चौकात येऊन इम्रानने दसºयाला तुला ठार मारतो असे मला धमकावले होते. त्याच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, हे लक्षात घेऊन साथीदारांच्या मदतीने इम्रानला मारण्याचा कट रचला. ओंकार ला मदतीला घेतले. पेस्ट कंट्रोलचे काम करीत असल्याने गुंगी आणणाºया औषधांबद्दल माहिती होती. दारू पिऊन झापेलेल्या इम्रानच्या तोंंडावर गुंगी आणणारी  किटकनाशक पावडर टाकली. नंतर अन्य साथीदारांच्या मदतीने त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारले. अशी कबुली आरोपीने दिली आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा