शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चेंबरची झाकणे चोरणारे चोर सापडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 02:34 IST

महापालिकेच्या संबंधित विभागाची डोकेदुखी, अपघात झाल्यानंतरच येणार का जाग?

रहाटणी : अनेक दिवसांपासून साई चौक ते कोकणे चौक या बीआरटीएस रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी भूमिगत ड्रेनेज आहे. ठिकठिकाणी चेंबर व त्यावर लोखंडी झाकण तयार केले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून अनेक चेंबरवरील झाकणे चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाची डोकेदुखी वाढली आहे.मागील काही दिवसांपासून साई चौकापासून चेंबरवरील लोखंडी झाकण चोरीच्या प्रकारास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक झाकणे चोरीला गेल्याने महापालिकेचा संबंधित विभाग चक्रावला आहे. रोज एक लोखंडी झाकण चोरीला जात असल्याने चोर पकडण्याचे आव्हान पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यापुढे उभे राहिले आहे.रहाटणी येथील साई चौक ते कोकणे चौक या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील चेंबर रस्त्यावर अथर्व मार्केटच्या समोर ४५ मीटर बीआरटी रस्त्यावरील स्ट्रॉम वॉटर लाईनच्या चेंबरवरील लोखंडी झाकण चोरीला गेलेले आहे. एक नव्हे तर अनेक झाकणे चोरीला गेली आहेत. एक एक करून या रस्त्यावरील सर्वच चेंबरवरील लोखंडी झाकणे चोरीला जातील की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे.पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा व्हावा म्हणून महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर भूमी अंतर्गत स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली. त्यासाठी ठिकठिकाणी चेंबरची निर्मिती केली. मात्र चेंबरवर लोखंडी झाकण असल्याने सध्या भंगार विक्रेते ही झाकणे चोरून नेत आहेत. मात्र, चेंबरवर झाकण नसल्याने यात मोठा अपघात होऊन एखाद्याला जीव गमवावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन लोखंडी चेंबर चोरीला कसे जाणार नाहीत, याची उपाययोजना करावी अन्यथा मोठा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.मागील काही दिवसांपासून रहाटणी, काळेवाडी परिसरातील रस्त्यावरील चेंबरचे लोखंडी झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या झाकणांना कापून चोरून नेले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अगदी तुटपुंज्या पैशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू झालेला आहे. याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असून, पोलीस प्रशासन किंवा महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचारी-अधिकारी यांनी अशा चोरट्यांवर नजर ठेवून ही चोरी रोखणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा अशा चेंबरमध्ये जीव गमवावा लागेल.या रस्त्यावरील स्ट्रॉम वॉटर लाईनचे चेंबर सुमारे सहा ते सात फूट खोल आहेत आणि हा रस्ता मुख्य वाहतुकीचा असल्याने यात एखादे वाहन पडून अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली. पिंपळे सौदागर तेवाकड हा मुख्य वाहतुकीचा व रहदारीचा रस्ता आहे. हे चेंबर वाटसरूच्या किंवा वाहनचालकाच्या नजरेस सहजासहजी पडत नाही.त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हे चेंबर फूटपाथच्या अगदी जवळ असल्याने एखादा वाटसरूदेखील यात पडू शकतो.

टॅग्स :Thiefचोरtheftचोरी