‘त्या’ कामगारांना महापालिकेत घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:04 AM2018-04-09T01:04:36+5:302018-04-09T01:04:36+5:30

पीसीएमटीचे पीएमटीत विलीनीकरण करून पुणे परिवहन महानगरची स्थापना करण्यात आली. त्या वेळी १७८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत घेतले होते.

They will take workers' corporation? | ‘त्या’ कामगारांना महापालिकेत घेणार?

‘त्या’ कामगारांना महापालिकेत घेणार?

Next

पिंपरी : पीसीएमटीचे पीएमटीत विलीनीकरण करून पुणे परिवहन महानगरची स्थापना करण्यात आली. त्या वेळी १७८ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत घेतले होते. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी संबंधित कर्मचा-यांना पीएमपीत वर्ग केले होते. मुंढे यांच्या बदलीनंतर या कर्मचाºयांना महापालिका सेवेत घेण्याचा घाट घातला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहनमधील (पीसीएमटी) अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले होते. या कर्मचाºयांची पुणे महानगर परिवहन महामंडळाला नितांत गरज असल्याने पीएमपीकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पिंपरी महापालिकेला दिले होते. तत्कालीन पालिका आयुक्तांनी या कर्मचाºयांना तत्काळ कार्यमुक्त केले होते. त्यानंतरही काही कर्मचारी पीएमपीमध्ये रुजू झाले नव्हते.
मुंढे यांनी पीएमपीमध्ये रुजू न झाल्यास कामावरून कमी करण्याचा इशारा देताच कर्मचारी रुजू झाले होते. यातील बहुतांश कर्मचारी गाववाले आणि राजकीय नेत्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ते प्रत्यक्षपणे काम करीत नव्हते. मुंढे यांनी त्यांना वठणीवर आणले होते. मुंढे यांची नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नयना गुंडे संचालक म्हणून आल्या आहेत.
>नेत्यांकडे फिल्डिंग
भाजपातही याबाबत दोन गट आहेत. एक गट कर्मचाºयांच्या बाजूने, तर एक गट विरोधात आहे. महापालिकेत वर्ग केले असताना संबंधित कर्मचारी काम करीत नव्हते म्हणून त्यांना महापालिका सेवेत घेऊ नये, असे एका गटाचे म्हणणे आहे; तर कर्मचाºयांवर अन्याय होऊ नये, अशी एका गटाची भूमिका आहे. या कर्मचाºयांना पालिकेत कायमस्वरुपी रुजू करुन घ्यायचे की तात्पुरत्या स्वरुपात यावर चर्चा सुरू आहे.

Web Title: They will take workers' corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.