शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘बैल गेला अन् झोपा केला’ म्हणतात ना, तसेच पालिकेने केले, काम झाल्यानंतर सल्लागार नेमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:40 IST

आयुक्त बंगल्यासमोरील रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण : एकूण रकमेपैकी १.४५ टक्के शुल्क देऊन घेणार विकतचा सल्ला

पिंपरी : ‘बैल गेला अन् झोपा केला’ ही म्हण सर्वांना माहिती आहेच, ती आठवयाचे कारण म्हणजे काळेवाडी फाटा ते चिखली या ‘बीआरटीएस’ मार्गावरील ऑटो क्लस्टर व आयुक्त बंगल्यासमोरील रस्ता पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून सल्लागार नेमण्यात आला आहे. एकूण कामाच्या खर्चाच्या रकमेपैकी १.४५ टक्के शुल्क त्या सल्लागार एजन्सीला दिले जाणार आहेत.काळेवाडी फाटा ते चिखलीतील देहू-आळंदी रस्ता असा ११ किलोमीटर अंतराचा बीआरटी मार्ग महापालिकेने विकसित केला; मात्र ऑटो क्लस्टर आणि आयुक्त बंगल्यासमोरील जागा एमआयडीसीकडून ताब्यात येण्यास विलंब झाल्याने हा मार्ग तब्बल १४ वर्षांपासून पूर्ण झाला नाही. युरोसिटी आणि इंड्रोलिक इंडस्ट्रियल को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड या उद्योगांची इमारत या मार्गास अडथळा ठरत होती. त्या उद्योगांना महापालिकेने २००७ मध्ये नोटीस दिली होती. त्यासंदर्भात एमआयडीसी विभागाशी पत्रव्यवहार केला. हा बीआरटी मार्ग २०१८ मध्ये बांधून तयार झाला. मात्र, येथील जागा ताब्यात येत नसल्याने पीएमपीएल बस सुमारे १ किलोमीटर वळसा मारून ये-जा करीत आहेत. अडथळा ठरणाऱ्या त्या उद्योगांचे एमआयडीसीच्या केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागेत स्थलांतरण करण्यात आले. त्यासाठी महापालिकेने नुकसानभरपाई म्हणून एमआयडीसीला सात कोटी रुपये दिले आहेत.काम झाल्यावर सल्लागारनोव्हेंबर २०२४ मध्ये इमारतीचा ताबा महापालिकेकडे देण्यात आला. इमारत पाडून तेथे रस्त्यासाठी सपाटीकरण केले आहे. तसेच, स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली आहे. विद्युत दिव्यांचे खांब उभे करण्यात येत आहेत. या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या कामासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. असे असताना स्थापत्य प्रकल्प विभागाने या कामासाठी आता सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी १५ जानेवारीला निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यात दोन सल्लागारांनी सहभाग घेतला. तांत्रिक गुणांनुसार मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक या एजन्सीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीत मान्यता दिली आहे.११ कि.मी. अंतराचा काळेवाडी फाटा ते चिखलीतील देहू-आळंदी रस्ता असा बीआरटी मार्ग महापालिकेने विकसित केला. मात्र, ऑटो क्लस्टर आणि आयुक्त बंगल्यासमोरील जागा एमआयडीसीकडून ताब्यात येण्यास विलंब झाल्याने हा मार्ग तब्बल १४ वर्षांपासून पूर्ण झाला नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे