‘ते’ कवितेतून करताहेत प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:37 IST2016-04-23T00:37:57+5:302016-04-23T00:37:57+5:30
दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर भेटी देऊन, कवितांच्या माध्यमातून चिंचवड येथील कैलास भैरट (वय ५७) हा तरुण पाणीबचतीसाठी प्रबोधन करीत आहेत.

‘ते’ कवितेतून करताहेत प्रबोधन
चिंचवड : दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर भेटी देऊन, कवितांच्या माध्यमातून चिंचवड येथील कैलास भैरट (वय ५७) हा तरुण पाणीबचतीसाठी प्रबोधन करीत आहेत.
काही महिन्यांपासून स्वत: वैयक्तिक पातळीवर, स्वखर्चाने बॅनर तयार करणे, फ्लेक्स लावणे, सामाजिक कार्यक्रमातून जागृती करणे, तसेच निसर्ग, पर्यावरण, पाणी बचत यावर कवितालेखन करून पाणी बचतीचा संदेश घराघरांत पोहोचावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. पाणी बचतीच्या त्यांच्या कवितांचे पोस्टर त्यांनी स्वत: अनेक कार्यालयांत भेट दिले आहेत.
भैरट हे ३० वर्षांपासून चिंचवड येथे वास्तव्यास आहेत. एका कंपनीत काम करण्याबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. भैरट म्हणाले, ‘‘राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, पाणीकपातीचे संकट असताना आपणच पाण्याचा योग्य वापर करून अपव्यय टाळणे शक्य आहे. इतर दुष्काळी भागातील परिस्थिती आपल्यावरही ओढावू शकते. पाणी शक्य तेथे वाचवता येते. पाणी जपून वापरणे, हाच पाणीबचतीचा सहज मार्ग आहे. या माध्यमातून पाणीबचत व्हावी हीच अपेक्षा आहे.’’(वार्ताहर)