शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची यंदा कोणतीही करवाढ नाही..! आगाऊ बिल भरणाऱ्यांना सवलती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:01 IST

आगाऊ ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सामान्य करात सवलत देण्यात येणार

पिंपरी : शहरातील निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र आणि मोकळ्या जागा यांच्या मालमत्ता करात २०२५-२६ या वर्षासाठी कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. सध्याचेच दर पुढील वर्षासाठी कायम ठेवले जाणार आहेत. आगाऊ ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे.शहरातील निवासी व बिगरनिवासी अशा एकूण ६ लाख ३५ हजार मालमत्तांची नोंद महापालिकेकडे आहे. मालमत्ता करात वाढ करण्यासाठी २० फेब्रुवारीपूर्वी त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार करसंकलन विभागाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यात कोणतीही दरवाढ न करता, सध्याच्याच दरास मान्यता देण्यात आली आहे. प्रशासकांनी मालमत्ता करात यंदाही कोणतीही वाढ केली नाही, ही बाब शहरवासीयांना दिलासा देणारी आहे.असे असतील सामान्य कराचे दर...एक ते १२ हजार रुपये करयोग्य मूल्य असलेल्या निवासी मालमत्तांना १३ टक्के सामान्य कर दर आहे. बिगरनिवासी मालमत्तांना १४ टक्के सामान्य कर आहे. १२ हजार १ रुपये ते ३० हजार रुपये करयोग्य मूल्य असलेल्या निवासी मालमत्तांना १६ टक्के आणि बिगर निवासी मालमत्तांना १७ टक्के सामान्य कर दर आहे. ३० हजार १ रुपये ते त्यापुढील करयोग्य मूल्य असलेल्या निवासी व बिगर निवासी मालमत्तांना २४ टक्के सामान्य कर लावला जातो.इतर करांचे दरसाफसफाई कर निवासी मालमत्तांना ५ टक्के व बिगर निवासी मालमत्तांना ६ टक्के आहे. अग्निशामक कर निवासी व बिगर निवासी मालमत्तांना २ टक्के आहे. महापालिका शिक्षण कर निवासी मालमत्तांना ४ टक्के आणि बिगर निवासी मालमत्तांना ५ टक्के आहे. मलप्रवाह सुविधा लाभ कर निवासी व बिगर निवासीसाठी ५ टक्के, पाणीपुरवठा लाभ कर निवासी मालमत्तांना ४ टक्के व बिगर निवासी मालमत्तांना ५ टक्के आहे. रस्ता कर निवासी मालमत्तांना २ टक्के व बिगर निवासी मालमत्तांना ३ टक्के आहे. वृक्षकर निवासी व बिगर निवासीसाठी एक टक्का आहे.दोन टक्के साफसफाई करमॉल, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालय, सभागृह, रुग्णालय, हॉटेल्स, कँटिन, रेस्टॉरंट या मालमत्तांना २ टक्के विशेष साफसफाई कर आहे. नाट्यगृह, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाटक, सर्कस, संगीत कार्यक्रम, कुस्ती, मुष्टियुद्ध यांना प्रत्येक खेळास ५० रुपये ते ३५० रुपये करमणूक कर आहे.यांना मिळणार सवलतीआगाऊ व ऑनलाइन बिल भरणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे सामान्य करात सवलत देण्यात येणार आहे. महिला, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी, ग्रीन बिल्डिंग, कंपोस्टिंग, एसटीपी, झिरो वेस्ट यंत्रणा असलेल्या निवासी मालमत्ता, शैक्षणिक इमारती, इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास सवलत दिली जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाPuneपुणेTaxकर