शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळ तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही; अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 09:31 IST

महिलेला कोरोना झाल्याची अफवा

ठळक मुद्देपरदेशातून आलेले १११ व त्यांच्या सहवासातील १३६ व्यक्ती असे २४७ जण देखरेखीखाली

मावळ : पुणे, मुंबई व इतर राज्यातून आलेल्या ३ हजार ७८३ व्यक्ती आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे व नियंत्रण कक्षाचे संनियंत्रक राहूल चोकलिंगम यांनी दिली मावळ तालुक्यातील ९१ हजार ५०० घरांची तपासणी करण्यात आली असून परदेश प्रवास करून आलेले १११ व त्यांच्या सहवासातील १३६व्यक्ती अशा २४७ जणांना आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असून त्यांची दररोज तपासणी केली जाते. थायलंड, जर्मनी, अमेरीका व इतर परदेश दौऱ्यातून मावळ तालुक्यात परतलेल्या व्यक्ती आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना त्यांच्याच घरात विलगीकरण कक्ष तयार करुन १४ दिवस ठेवण्यात येत आहे. तालुक्यातील वडगाव,तळेगाव, कामशेत, लोणावळा या शहरासह अन्य शहरे तसेच खेड्यापाड्यातील प्रत्येक गावात आशा व आरोग्य खात्याचे डॉक्टर या पदकाद्वारे  तपासणीचे काम सुरू आहे .आत्तापर्यंत तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका. स्वताची व कुटूबीयांची काळजी घ्या असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी केले आहे. 

महिलेची अफवा..सोमाटणे फाटा होम क्लारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या आईला कोरोना झाल्याची अफवा कोणीतरी पसवल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोमाटणे येथील एका सोसायटीत १९ मार्च रोजी थायलंड येथून एक युवक आला होता. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या आईला ताप आला होता. म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पिपरी येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. शिवाय संबंधित रूग्णाच्या वडिलांना घरीही सोडण्यात आले. त्यामुळे हा रूग्ण कोरोनाबाधित नाही. तहसीलदार मधुसुदन बर्गे,आमदार सुनील शेळके, आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत लोहारे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. कुणीही घाबरू नये असे आवाहन करण्यात आले. यापुढे अफवा पसविल्यास त्वरीत गुन्हा दाखल करण्यात येईल असा ईशारा दिला आहे. 

टॅग्स :mavalमावळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस