शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

पहलगामच्या बैसरण घाटीचा रस्ता बिकट अन् किचकट, एकही सुरक्षारक्षक नाही, आकुर्डीतील पर्यटकाचा अनुभव

By विश्वास मोरे | Updated: April 23, 2025 19:54 IST

पहलगामच्या या भागात एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही, फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते

पिंपरी : मी आणि पत्नी १५ एप्रिलला काश्मीर फिरण्यासाठी आलो आहे. लेह लडाखला जाताना रस्त्यात पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे, असे कळताच पुढचे फिरण्याचे नियोजन रद्द केले आहे. आम्ही परत श्रीनगरला आलो. पेहलगाम बैसरण घाटी पर्यटनस्थळ असतानाही येथे एकही सुरक्षारक्षक दिसून आला नाही, हा रस्ता खूप बिकट आणि किचकट असल्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडले असावे, असे सांगत होते आकुर्डीतील नागरिक बशीर सुतार. 

बैसरण घाटी येथे एक दिवस अगोदरच बशीर सुतार कुटुंब गेले होते. सुतार म्हणाले, 'काल पहलगाममध्ये हल्ला झाला आहे, असे कळाले. त्यामुळे रात्रीच श्रीनगरला आलो. जिथे हल्ला झाला त्या ठिकाणी एक दिवस आधीच फिरून आलो होतो. त्याठिकाणी रस्ता खूप अरुंद आहे. तिथे घोड्याशिवाय जाता येत नाही. कमीत कमी एक ते दीड तास लागतो. या ठिकाणास मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात. येथे बजरंगी भाईजानमधील मुन्नीचजे घर दाखवले आहे, ते येथे आहे. त्यामुळे इथे पर्यटक येत असतात. परंतु, येथे एकही सुरक्षा दलाचा एकही जण पाहायला मिळाला नाही. फक्त मुख्य रस्त्यावर सुरक्षादलाचे सैनिक होते. घाटीचा हा रस्ता खूप बिकट आणि किचकट असल्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाण निवडले असावे. आम्ही उर्वरित कार्यक्रम रद्द केला आहे. आमचे दिनांक २८ एप्रिलला श्रीनगर ते मुंबई तिकीट होतं, ते रद्द करून २४ एप्रिलचे तिकीट पुन्हा आरक्षित केलं आहे.

 दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार ठप्प झाला आहे. घोड्यावाले, हॉटेल, रस्त्यावर छोटी-छोटी दुकाने आहेत. बोटीमध्येमध्ये फिरवणारे जे लोक असतात, आता त्यांचाही रोजगार गेला आहे. आज श्रीनगरला रस्त्यावर एकही गाडी दिसली नाही. पर्यटकांची गर्दी असणारे शहरात भकास वातावरण दिसून आले. सर्व काही ठप्प झाले आहे. यासाठी सरकारने कठोर पाऊले उचलली पाहिजेत. वातावरण पूर्ववत व्हायला हवे. आज जेव्हा देशाचे गृहमंत्री या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्यासाठी सर्व सुरक्षा दले तिथे हजर होती. मात्र, काल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काहीच व्यवस्था नव्हती, याचे खूप दुःख वाटते. पर्यटकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? घडलेली घटना दुर्दैवी आहे.'

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरtourismपर्यटनSocialसामाजिकTerrorismदहशतवाद