शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही शहरांमध्ये 'रिंग रोड' होतोय वाहनांसाठी, पण माणसांसाठी काही नियोजन आहे की नाही?

By नारायण बडगुजर | Updated: June 15, 2025 14:23 IST

लोकमत स्पेशल - पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्याच्या नियोजनात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव : वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार?

नारायण बडगुजर

पिंपरी :पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) प्रस्तावित आहे. मात्र, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परिणामी वाहनांची संख्या वाढून रिंग रोडवरही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. केवळ वाहनांसाठी रिंग रोड होईल; मात्र, प्रवासी वाहतुकीसाठी काही नियोजन आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उद्देश सफल होणार का ?पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड प्रस्तावित आहे. यातून शहर व उपनगर, एमआयडीसी परिसरात कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. मात्र, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यातून वाहनांची संख्या वाढून रस्त्यांवर गर्दी होत आहे. रिंग रोड अस्तित्वात आल्यानंतर वाहनसंख्येत भर पडून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्याचा उद्देश सफल होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव

पुणे महानगर (पीएमआरडीए) हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यामुळे प्रशासन ढेपाळले आहे. प्रशासनातील विविध विभाग आणि यंत्रणांमध्ये वाहतूक समस्या सोडविण्यासाठी समन्वय साधला जात नाही. त्यामुळे एकत्रित उपाययोजना होत नाहीत.

पीएमपीएमएलवर वाहतुकीचा भारपुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह परिसरासाठी पीएमपीएमएल बससेवा ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मेट्रो तसेच लोणावळा-पुणे ही उपनगरीय (लोकल) रेल्वेसेवाही आहे. मात्र, मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेसेवेला मर्यादा आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा भार बससेवेवर आहे.

पर्यायांचा विचार कोण करणार?वाहने वाढत आहेत म्हणून रस्ते तयार करायचे आणि प्रशस्त रस्ते आहेत म्हणून नागरिकांनी वाहने खरेदी करायची, असा प्रकार सुरू आहे. ट्राम, रेल्वे, मेट्रो, बस ट्रान्झिटची प्रभावी योजना अद्याप नाही. पुणे महानगर क्षेत्रातील एकत्रित विकासासाठी पीएमआरडीए कार्यान्वित करण्यात आले. मात्र, रस्ते वाहतुकीला पर्यायी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याबाबत पीएमआरडीए प्रशासन सध्या विचार करीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकल्पांची तुलना

प्रकल्प : पुणे (पीएमआरडीए) - नवी मुंबई (एमएमआरडीए)रिंग रोड : प्रस्तावित, संथ गतीने - वाशी-बेलापूर-विकास मार्ग प्रगत

मेट्रो/रेल्वे : मेट्रो केवळ आराखड्यात - प्रत्यक्षात लोकल मेट्रो

विमानतळ कनेक्टिव्हिटी : अजून नियोजनाधीन - लोकलमार्गे जोडणी कार्यान्वित

सार्वजनिक वाहतूक : अपुरी आणि विस्कळीत - सुटसुटीत आणि नियोजित

 पीएमआरडीएने करायच्या उपाययोजना :

लोहमार्गासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा.रिंग रोडच्या बाजूने उपनगरीय रेल्वेमार्ग निश्चित करावा.रेल्वे, राज्य व केंद्र सरकारचा निधी वेगाने उपलब्ध करून कामाला गती द्यावी.मेट्रोच्या तुलनेत उपनगरीय रेल्वेचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा.

पीएमआरडीएचा रिंग रोडप्रशासकीय मान्यता : १४,२०० कोटी रुपयेएकूण लांबी – ८३.१२ कि.मी.एकूण रुंदी – ६५.०० मी.रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी) – २

बोगदे – ११ (एकूण १२.६२ कि.मी.)

प्रमुख पूल – १७

इंटरचेंज – ९

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रो