शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"ग्यानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी" अन् टाळ - मृदंगाच्या गजरात निघणार तुकोबांची पालखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 18:57 IST

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याच्या तयारी पुर्ण

देहूगाव : जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी सोहळ्याच्या तयारी पुर्ण झाली असून श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासन देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने श्री क्षेत्र देहूगावत आलेल्या वारकऱ्यांमुळे सारा परिसर भक्तीमय झाला आहे. परिसरात हरिनामासह ज्ञानोबा तुकाराम यांच्या नामाचा गजर सुरू असून भाविक भक्तीरसात डुबंलेले पाहायला मिळत आहे. सोमवारी (उद्या) दुपारी २.३० वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.   अन्नदात्या बळीराज्याला पावसाची प्रतिक्षा अजुन संपली नसली तरी हरि भेटीसाठी मात्र पावलोपावली आसुसलेला पहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्ष पांडूरंगाची भेट अवघ्या काही दिवसातच होणार या विचारानेच चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे भाविकांसह स्थानिकांच्या जीवाची काहील होत असतानाच आज काहीसे ढगाळ हवामानामुळे भाविकांचे जथ्थे भजनामध्ये दंग झालेले पाहायला मिळत आहे. सारा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघत असल्याचे पहायला मिळत आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वैंकुठगमण मंदिर, विठ्ठलनगर, येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर व अनगडशहावली दर्गा परिसरासह इंद्रायणीच्या नदीकाठावर भाविकांची गर्दी दिसून येते आहे. वारकरी भागवत धर्माची भगवी पताका घेऊन तर महिला तुळशी वृदांवन डोक्यावर घेऊन आनंदात नाचत अभंग गात मंदिराच्या परिसरात फुगड्या घालत आहे.  या भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक प्रशासन सज्ज असून आजही काही भागातील रस्त्यांच्या कडेला पाणी साचलेल्या जागा व खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा उचलण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. पालखी सोहळ्याच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तालाही कालपासूनच सुरवात झाली आहे. 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022