शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणारा हातोडा

By विश्वास मोरे | Updated: February 12, 2024 17:24 IST

क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली

पिंपरी: रावेत येथील क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने हातोडा फिरविण्यात येणार आहे. अकादमीच्या इमारत मालकाला महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने नोटीस दिलेली आहे. अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली. त्यानंतर शेख याचे अनेक कारनामे उघड होत आहेत.  पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची समांतर चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी नौशाद शेख याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पॉस्को आणि अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.

महापालिका पथकाने केली जागेची पाहणी!

क्रिएटिव्ह अकादमीची निवासी शाळा रावेत इथे आहे. हा परिसर महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतो. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अकादमीच्या निवासी शाळेत जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना ओपन स्पेस आणि साईड मार्जिनमध्ये अनधिकृत बांधकाम आढळून आले आणि पत्रा शेड व स्टोअर रूम केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने इमारतीचे मालक यांना नोटीस देण्यात आली आहे. 

काय आहे नोटीसमध्ये!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथकाने आपल्या इमारत परिसराची पाहणी केली. त्यामध्ये साईड मार्जिन आणि इतर भागांमध्ये आपण पत्राशेड उभारली आहे.  तसेच काही भाग कव्हर केला आहे. संबंधित वाढीव बांधकाम ३० दिवसाच्या आत काढून टाकावे अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल. तसेच कारवाई साठी लागणारा खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल, असे नोटीस मध्ये नमूद केले आहे.

क्रिएटिव्ह अकादमी बाबत तक्रार आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. बांधकाम परवानगी विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केली. त्यामध्ये काही वाढीव बांधकाम आढळले आहे. संबंधित इमारत ही पीएमआरडीए च्या हद्दीतील आहे. त्यास पीएमआरडीचा परवाना असल्याची माहिती पुढे आली आहे. अनधिकृत वाढीव बांधकाम महापालिकेच्या वतीने पाडण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. नोटीसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पाडण्यात येईल.  -अमित पंडित (क्षेत्रीय अधिकारी ब प्रभाग)

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाEducationशिक्षणSchoolशाळा