शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है..!आश्चर्यच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पर्यावरणवादी स्थानबद्ध 

By विश्वास मोरे | Updated: May 10, 2025 17:44 IST

मुळा नदीच्या सुशोभीकरणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे.  

 पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार योजना जाहीर केलेली आहे. मुळा नदीच्या सुशोभीकरणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीच्या दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड आणि आळंदीमधील पर्यावरणवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते. त्यावर 'सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है...' अशा घोषणा सोशलमिडीयावर  कार्यकर्त्यांनी दिल्या.     

पिंपरी- चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्या वाहतात. या नद्यांच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेच्या वतीने सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शहराच्या सीमेवर असणाऱ्या नदी सुशोभीकरणास पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पर्यावरणवादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.  त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलने, मानवी साखळी करून निषेध केला जात आहे.  त्याचबरोबर विविध पक्षीय नेत्यांना निवेदनही दिले आहे. विरोध डावलून काम सुरूच आहे.  कशाला बोलावलं माहिती मिळेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दीड या दरम्यान आळंदीच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील आणि आळंदी येथील पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेतले होते. त्यांना आपल्याला कशाला बोलावलं आहे, याची माहिती दिली नाही, थांबून ठेवले त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सोडून देण्यात आले. 'सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.   आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष कोमल काळभोर, त्याचबरोबर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गणेश बोरा, ग्रीन आर्मी चे प्रशांत राऊळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे यांना स्थानबद्ध केले होते. या कारवाईच्या विरोधात राऊळ  यांनी पोलीस ठाण्यासमोरच सांकेतिक उपोषण केले. 

आज सकाळी अकरा वाजता मला आळंदी देवाची पोलीस ठाणे येथून फोन आला. एक पोलीस गाडी पाठवून पोलीस ठाण्यास घेऊन गेले.  त्यानंतर दोन तास म्हणजे दुपारी एकपर्यंत त्यांनी बसून ठेवले.  त्यांनी मला पोलीसस्टेशनमध्ये का बसून ठेवले? याचे कारण सांगितले नाही, याबाबत मी अर्ज दिला आहे.  - कोमल काळभोर (अध्यक्ष, इंद्रायणी सेवा फाउंडेशन, आळंदी)  विविध संघटना, संस्था,पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने सनदशीर मार्गाने इंद्रायणी,पवना, मुळा,मुठा या नद्यांबाबत नदी सुधार प्रकल्पअंतर्गत जो विध्वंस सुरू असून, विविध जैव विविधता अत्यंत निर्दयीपणे नष्ट करत आहेत. कायद्याची पायमल्ली करून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्था संघटना व पर्यावरणवादी कार्यकर्ते या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती व आंदोलन सुरू आहे. मला आज सकाळपासून नजर कैद केले होते.  सनदशीरमार्गाने आंदोलन करणे हा संविधानिक भारतीय नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे. मात्र आमचा अधिकार पायदळी तुडवला जातो. - मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण