टेम्पोखाली सापडून मृत्यू

By Admin | Updated: March 28, 2017 02:43 IST2017-03-28T02:43:05+5:302017-03-28T02:43:05+5:30

चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये टेम्पो दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक टेम्पो सुरू होऊन अंगावरून गेल्यामुळे

Temptation and death | टेम्पोखाली सापडून मृत्यू

टेम्पोखाली सापडून मृत्यू

पिंपरी : चिंचवड येथील पूर्णानगरमध्ये टेम्पो दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक टेम्पो सुरू होऊन अंगावरून गेल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. आकाश भैरू घाटशिळे (वय २१, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अमृत कापसे (वय १९) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा पूर्णानगरमध्ये टेम्पो दुरुस्तीसाठी घेऊन आला होता. परंतु हॅण्डब्रेक न लावता त्याला चावी तशी
ठेवून तो काम करीत होता. त्या वेळी अचानक टेम्पो सुरू झाला.  अंगावरून टेम्पो गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असे
घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले. परंतु नेमका कशामुळे मृत्यू झाला याचा तपास निगडी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Temptation and death