शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

हीच वारीची शिकवण अन् मोठंपण ! संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मुस्लीम कारागिरांनी दिली चकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:29 IST

मुस्लिम कारागिरांनी पालखी रथाला सेवाभावी वृत्तीने दिली चकाकी; काम करणाऱ्या कारागिरांनी सांगितलं यामागचं 'हे'कारण..

देहूगाव: आषाढी वारीच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने १ जुलै रोजी दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळा असल्याने प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याही वर्षी पालखी रथामध्ये जाणार नसली तरी मंदिराच्या आवारात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून प्रदक्षिणा घालण्यात येणार असल्याने सालाबादप्रमाणे पालखी आणि रथाला चकाकी देण्याचे काम आज (दि.२६ ) सुरू करण्यात आले आहे.

पालखी रथाबरोबरच पालखी व पादुकांच्या बरोबर या सोहळ्याबरोबर नेण्यात येत असलेली आभुषणे, अब्दागिरी, चौपदाराचे दंड, गरूड टक्के, समया, विठ्ठल रुक्मिनी मंदिरातील महिरप नव्याने करण्यात येत आहे. मंदिरातील चौकटी, दरवाजे, अभिषेकाचे व पूजेचे थाळ, चौरंग, पाट यांची पिंपरी येथील घनशाम ज्वेलर्स यांच्यावतीने ८ कारागिरांच्या मदतीने चकाकी देण्याचे काम केले आहे.हे त्यांचे ६ वर्षे असून हे काम विनामूल्य सेवाभावी वृत्तीने करतात. पालखी व पालखी रथाला चकाकी देण्यासाठी यंदाही स्वयंचलित तांब्याच्या तारा असलेला ब्रश वापरण्यात आल्याची माहिती कुशल वर्मा यांनी दिली. यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅन्टायझर आणि फिजिकल डिस्टंन्सचे पालन करीत सर्व कर्मचाऱ्यांनी चकाकी देण्याचे काम पुर्ण केले. यासाठी १५ लिटर लिंबू चिंचपाणी, रिठा आणि काही चकाकी देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रसायनांचा वापर करत दोन यांत्रिकी ब्रश, कापड आदी साहित्याचा वापर करण्यात आला.

या वेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानूदास महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्थ विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व माणिक महाराज मोरे पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार निवृत्ती गिराम आदी उपस्थित होते.

यंदा पालखी सोहळा नेहमीप्रमाणे होणार नसल्याने पालखी रथ खडकी येथील ५१२ वर्कशॉप मध्ये न नेता त्याची देखभाल व दुरूस्ती जागेवरच यापूर्वीच करण्यात आली आहे. पालखीला चकाकी देण्यासाठी पारंपारिक पद्धतीने रिठे, लिंबू आणि चिंच यांचा रस काढून त्याचे मिश्रण तयार करण्यात आले. हे मिश्रण वापरून चकाकी देण्याचे काम करण्यात आले. 

यासाठी कुशल वर्मा यांच्या देखरेख व शोएब शेख यांच्या मार्गदर्शनाने सुनील दीक्षित आरिफ मोमीन, अरबाज शेख, शहनवाझ खान, यांनी सेवा भावी वृत्तीने चकाकी देण्याचे काम केले.

टॅग्स :dehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याMuslimमुस्लीम