शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ते सोमाटणे फाटा बनलाय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:39 IST

अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष, दुभाजकांची दुरवस्था

ठळक मुद्देसिग्नल ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थितीवाहतूक पोलीस नसल्याने येथे वाहतूककोंडी; उपाययोजना करावी अशी मागणी

विलास भेगडे- तळेगाव दाभाडे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव ते सोमाटणे फाटा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने धोक्याचा बनला असून, येथील लिंब फाटा हा तर मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणच्या अपघातांचे सत्र थांबता थांबेना!  मागील आठवड्यात झालेल्या विचित्र अपघातात प्रसाद शिवाजी बारगड (वय २४) या महाविद्यालयीन युवकाला प्राण गमवावे लागले. या ठिकाणी होत असलेले वाढते अपघात ही तळेगावकरांची खरी शोकांतिका आहे. लिंब फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला लहान खडी आणि कच साचली आहे. तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिर येथे तीव्र उतार असल्याने वरचेवर अपघात घडत आहेत. लिंब फाटा येथे वाहतूक पोलिसांचा वानवा आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असा इशारा फलकांची अवस्थाही तशीच आहे.........अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष, दुभाजकांची दुरवस्थाया भागात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना वेळच नाही. नेहमी बंद असलेले सिग्नल ही लिंब फाट्याची आता नवीन ओळख होऊ लागली आहे. विशेष म्हणजे हा फाटा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. सुसाट जाणारे डंपर, हायवा आणि चारचाकी यांना पायबंद घालणार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. लिंब फाटा येथे सर्व्हिस रोडसाठी उभारलेल्या दुभाजकांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे या ठिकाणी वरचेवर लहान-मोठे अपघात होत आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी करतात तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे...............आवश्यक ठिकाणी असे फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. मुख्य रस्ता व सेवा रस्ता यांच्यात फारकत करणाऱ्या दुभाजकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दुभाजकावरील फारशा तुटून गेल्याने अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात वाहनचालक दुचाकीसह अडकून पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. २दुभाजक सुरू होत आहे हे दर्शवणारे फलकही नाहीत. लिंब फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार आहे. समोरून येणाऱ्या वाहनचालकाला अंदाज नसल्याने तळेगावकडे वळताना येथे हमखास अपघात घडतात. येथील सिग्नल ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती आहे. सिग्नल अनेकदा बंद असतो. वाहतूक पोलीस नसल्याने येथे वाहतूककोंडीही होते. उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhighwayमहामार्गAccidentअपघातdehuroadदेहूरोड