स्वाइन फ्लू बळावला
By Admin | Updated: August 14, 2015 03:12 IST2015-08-14T03:12:52+5:302015-08-14T03:12:52+5:30
पावसाळी वातावरणामुळे साथीचे आजार बळाण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लूचा विळखा शहरास बसू लागला आहे.

स्वाइन फ्लू बळावला
पिंपरी : पावसाळी वातावरणामुळे साथीचे आजार बळाण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियासह स्वाइन फ्लूचा विळखा शहरास बसू लागला आहे. साथीचे आजार वाढत असताना महापालिका यंत्रणा अजूनही ढिम्म असल्याचे दिसून येते. पावसाळा सुरू झाल्यानंतर स्वाइन फ्लूचा पहिला बळी जुन्नरची महिला ठरली आहे. पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढायला सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी याच वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी महिन्यापासूनच
स्वाइन फ्लूचे रुग्ण अधिक आढळून आले.
गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने ३३ जणांचा बळी घेतला आहे. दिनांक १ जानेवारी २०१५पासून आजपर्यंत ६ लाख ७१ हजार ८५६ रुग्णांची प्राथमिक तपासणी झाली आहे. यापैकी ८१ हजार ७१६ जणांना सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असल्याचे आढळले. यातील एकूण २० हजार ७०१ जणांना टॅमी फ्लू देण्यात आल्या. यामधून ६९० रुग्णांचे लाळेचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. स्वाइन फ्लूची लागण झालेले ३७२ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.
आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. महापालिकेच्या वतीने स्वाइन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज आहे. मात्र, प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतेय
२००९मध्ये स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्या वर्षात स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूची संख्या २१ इतकी होती. या तापामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सर्वाधिक संख्या सन २०१०मध्ये होती. ५६ जणांचा बळी घेतला होता. पोहोचला होता. तर, २०११मध्ये फक्त एकच मृत्यू झाला होता.
नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, डोके दुखत असल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. औषधाच्या दुकानात जाऊन परस्पर औषधे घेऊ नयेत. अधिक माहितीसाठी किंवा उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात संपर्क साधावा, गरोदर स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घेणे,
मधुमेह, रक्तदाब असे इतर
आजार असणाऱ्यांनीही काळजी
घेणे, आवश्यकता असल्यास टॅमी फ्लूच्या गोळ्या घ्याव्यात, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे
आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी
केले आहे. (प्रतिनिधी)