‘स्वाइन फ्लू’ने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 31, 2016 05:32 IST2016-12-31T05:32:20+5:302016-12-31T05:32:20+5:30

थंडी वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड परिसरात स्वाइन फ्लू वाढू लागला आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात सोळावर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

'Swine Flu' dies of youth | ‘स्वाइन फ्लू’ने तरुणाचा मृत्यू

‘स्वाइन फ्लू’ने तरुणाचा मृत्यू

पिंपरी : थंडी वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड परिसरात स्वाइन फ्लू वाढू लागला आहे. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात सोळावर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या वर्षात स्वाइन फ्लूने मृत्यू झालेला हा दुसरा रुग्ण आहे.
थेरगाव येथील हा रुग्ण असून, त्यास बुधवारी रुग्णालयात
दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले. शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले, ‘‘वातावरणातील बदल आणि थंडी यांमुळे साथीचे
रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयांची बैठक बोलावून सर्व आढावा घेतला आहे.’’ (प्रतिनिधी)

Web Title: 'Swine Flu' dies of youth