महिलेचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: April 28, 2017 05:55 IST2017-04-28T05:55:11+5:302017-04-28T05:55:11+5:30

लोणावळा धरणाजवळ मान्सून लेकच्या पाठीमागील गुलाब एंटरप्राइजेस येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Suspicious death of a woman | महिलेचा संशयास्पद मृत्यू

महिलेचा संशयास्पद मृत्यू

लोणावळा : लोणावळा धरणाजवळ मान्सून लेकच्या पाठीमागील गुलाब एंटरप्राइजेस येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा पती त्यांच्या दोन मुलींसह फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सलमा परवेज खान (वय ३८, रा. गुलाब एंटरप्राइजेस, मान्सून लेकच्या पाठीमागे, आय.एन.एस. शिवाजी रस्ता, लोणावळा) असे आहे. सदर महिला ही तिचा पती आणि दोन लहान मुलींसह मोलमजुरी करून रहात होती. पतीला दारूचे व्यसन असल्याने त्याच्याकडून या महिलेला नेहमीच मारहाण केली जात असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. मागील ४ ते ५ दिवसांपूर्वीच पतीने डोक्यात काहीतरी मारल्याने ती महिला जखमी झाली होती. बुधवारी २६ एप्रिल रोजी सकाळी सदर महिला तिच्या घराच्या बाहेरील मोकळ्या जागेत मृतावस्थेत आढळून आल्याचे आणि तिचा पती त्याच्या दोन लहान मुलींसह गायब असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता महिलेच्या मृत्यूचे कारण हे तिला आलेला अशक्तपणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, तपास उपनिरीक्षक आय. जे. शेख करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Suspicious death of a woman