शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृष्ण प्रकाश यांची मध्यरात्री वेशांतर करून 'Surprise Visit'; बेजबाबदार पोलिसांची निघाली चांगलीच 'विकेट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 23:06 IST

कृष्ण प्रकाश यांचा वेशांतर करून बेजबाबदार पोलिसांना दणका; पोलीस ठाण्यांना भेट देऊन केली नाकाबंदीची पाहणी 

पिंपरी : सामान्य नागरिकांशी पोलीस कसे वागतात, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात का, याबाबत पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून शहरात फिरले. पोलीस ठाण्यांना त्यांनी भेट दिली. तसेच शहरातील नाकाबंदीचीही पाहणी केली. विशेष म्हणजे या वेळी पोलिसांनीही त्यांना ओळखले नाही. 

शहरातील पोलीस सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वत: याबाबत खात्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वेशांतर करून बुधवारी रात्री कृष्ण प्रकाश शहरात फिरले. पिळदार मिश्यांसाठी ओळखले जाणारे कृष्ण प्रकाश यांनी दाढी चिटकवली तसेच डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग देखील चढवला. सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे आणि इतर दोन पोलीस यांनीसुध्दा वेशांतर करून आयुक्तांसोबत होते.

वेशांतर करून ते दोघे पिंपरी पोलीस ठाण्यात गेले. आमच्या शेजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला रुग्णवाहिका पाहिजे. मात्र, चालक ८००० रुपयांची मागणी करीत आहे. ही आमची लुट आहे, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र तेथील पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. हे आमचे काम नाही, असे त्यावेळी हजर असलेल्या पोलिसाने आयुक्तांना सांगितले. चिडलेल्या कृष्ण  प्रकाश यांनी मास्क काढून आपली ओळख सांगितली. त्यामुळे तो पोलीस गोंधळला आणि पोलीस ठाण्यात खळबळ उडाली.

रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यांमध्ये गेले. आमचा रमजान सुरू आहे. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा त्रास होतो. त्यांना हटकले असता, काहींनी माझ्या बायकोची छेड काढून मला लाथा मारल्या, अशी तक्रार केली. वाकड आणि हिंजवडी पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. तसेच तक्रार नोंदवून घेण्याची तयारी करून वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. आमचे वरिष्ठ येतीलच थोड्या वेळात. घाबरू नका, उशीर झाला तर आम्ही सोडू तुम्हाला घरी, असे सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी आपली ओळख सांगितली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

पिंपरी पोलीस ठाण्याला ‘मेमो’तक्रारदार म्हणून पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा वाईट अनुभव आयुक्तांना आला. त्यामुळे त्यांना मेमो बजावण्यात येणार आहे. तसेच हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्यात चांगला अनुभव आल्याने त्यांना रिवॉर्ड देण्यात येईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. शहरात नाकाबंदी चांगल्या पद्धतीने होत असल्याचे या पाहणीत आयुक्तांना दिसून आले.  

कोरोनामुळे लोक त्रासले आहेत. त्यात निर्बंध असल्याने त्यांची अधिक अडचण होत आहे. असे असतानाच सामान्य लोकांना त्रास व्हायला नको, यासाठी वेशांतर करून शहरात फेरफटका मारला. त्यात नागरिकांशी पोलीस कसे वागतात, याची पाहणी केली. वाकड आणि हिंजवडीत चांगला अनुभव आला. मात्र पिंपरी पोलिसांचा प्रतिसाद वाईट होता. - कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्त