शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच सुरेश प्रभू यांची गच्छंती - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 17:59 IST

बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवासी सेवा सक्षम करा, असे धोरण माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतले होते. बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच प्रभूंचे रेल्वे खाते काढून घेतले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

पिंपरी चिंचवड : बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे प्रवासी सेवा सक्षम करा, असे धोरण माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतले होते. बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच प्रभूंचे रेल्वे खाते काढून घेतले, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

मुंबई येथील परळ येथे रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला. याविषयी पवार यांना विचारले असताना त्यांनी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीका केली. पवार म्हणाले, ‘‘बुलेट ट्रेन कशासाठी आणि कोणासाठी. हा खरा प्रश्न आहे. हजारो कोटींचे प्रकल्प राबविण्यापेक्षा रेल्वे यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे. रेल्वे प्रवाशी सेवा चांगली करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात सरकार कमी पडले आहे. रेल्वे सेवेवर ताण येत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईत अपघात झाला. रेल्वे सेवा सक्षम करा. बुलेट ट्रेन असे कोट्यवधींचे प्रकल्प राबवू नका, असे विचार प्रभूंनी मांडले होते. त्यांना मोदींनी दूर करून पियुष गोयलांच्या माध्यमातून प्रकल्प दामटण्याचे काम सुरू केले आहे. याचा फायदा किती लोकांना होणार आहे. त्याचे तिकीट परवडणारे आहे का?’’

मुंबई पोलिसांनी जारी केले हेल्पलाईन क्रमांककेईएम हॉस्पिटल : 022-24107000वेस्टर्न रेल्वे कंट्रोल रूम : 022-23070564, 022-23017379, 022-23635959मुंबई रेल्वे कंट्रोल रूम : 022-23081725ट्रॅफिक हेल्पलाइन व्हॉट्सअॅप नंबर : 8454999999

नेमके काय घडले एलफिन्स्टन ब्रिजवर?सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते. त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काहीजणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली.

अफवांवर विश्वास ठेवू नकाअग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वाहतूक आणि प्रवाशांसाठी हा पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

कोट्यवधी खर्च करुन उभारला होता पूलरेल्वे प्रशासनाने परळ येथे कोट्यवधी खर्च करून पादचारी पूल उभारला आहे. हा पूल दादरच्या दिशेला जाणारा आहे.  या पुलाचा वापर होणार नाही, त्यामुळे हा पैशांचा अपव्यय ठरेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांसह नागरिकांनी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या प्रतिक्रियांना केराची टोपली दाखवून पूल उभारला. यामुळे मुंबई दिशेकडील पुलावरील प्रत्यक्ष गर्दी जैसे थेच राहिली होती. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आता तरी जाग येईल का? , असा सवाल संतप्त स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.दुर्घटनेतील मृतांची नावेमसूद आलमशुभलता शेट्टीसुजाता शेट्टीश्रद्धा वरपेमीना वरुणकरतेरेसा फर्नांडिसमुकेश मिश्रासचिन कदममयुरेश हळदणकरअंकुश जैस्वालसुरेश जैस्वालज्योतिबा चव्हाणरोहित परबअॅलेक्स कुरियाहिलोनी देढीयाचंदन गणेश सिंहमोहम्मद शकील

 

टॅग्स :AccidentअपघातElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीwestern railwayपश्चिम रेल्वेcentral railwayमध्ये रेल्वे