शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून पिंपरीत पर्यावरणाला हातभार; शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 4:26 PM

चिंचवडे नगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयं रोजगार मिळावा या हेतूने कागदी पिशव्यांची निर्मिती करत आहेत. 

ठळक मुद्देशेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने कागदी पिशव्यांची निर्मितीमहिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी सुरु केला उपक्रम

रावेत : प्लॅस्टिक बॅगच्या वापरामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. प्रदूषणाला आळा बसावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी चिंचवडे नगर येथील शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी स्वयं रोजगार मिळावा या हेतूने कागदी पिशव्यांची निर्मिती करत आहेत. परिसरातील गरीब, होतकरू महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन महिन्याला हजारो पिशव्यांची निर्मिती करत आहेत. युथ फाउंडेशनने समाजाशी नाळ कायम जोडलेली राहावी म्हणून झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देत झाडे लावून त्यांची जपणूक केली आहे.  प्रदूषणाला आळा बसावा म्हणून प्लॅस्टिक बॅगला पर्याय म्हणून कागदी पिशव्या बनवण्याची संकल्पना त्यांना सूचली. येणाऱ्या काळात प्लॅस्टिक पिशवीबंदी महाराष्ट्र शासन जारी करण्याची शक्यता आहे. काळाची पावले ओळखून महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनने हा उपक्रम सुरु केला आहे.गेल्या दीड वर्षापासून शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील महिलाना हाताला काम मिळावे यासाठी सर्वप्रथम महिला संघटन करीत सलग ८५ बचत गटांची स्थापना करण्यात आली. बचतगट महासंघ स्थापले गेले. मात्र मागेल त्याला काम या संकल्पनेतून विविध क्षेत्रात महिलाना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याकडे नेहमी पाठपुरावा राहिला. नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमामध्ये महिलांना जास्तीत जास्त घरबसल्या काम मिळावे आणि त्यांचे अर्थाजन व्हावे या हेतूने घरबसल्या रद्दीपासून कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण गेले दोन दिवस चालू केले यासाठी महिलाचा प्रतिसाद लाभला. या उपक्रमात सर्वप्रथम तुळजाई बचत गट रजनीगंधा हौसिंग सोसायटी यांनी प्रथम पुढाकार घेतला. या उपक्रमात सुविधा इंगळे, कल्याणी महाजन, शीतल काकडे, संगीता पोळ, किरण चव्हाण, अनुजा जगताप, जयश्री खडकीकर, रोहिणी बेडसे, स्मिता पाटील, सीमा पाठक, सविता पाटील, अमृता चौधरी, सुनीता दुधाळ, कविता धनगर, टीना सिंग, सुरेखा कांबळे, मीरा जगताप, कोमल ढवळे या महिलानी प्रशिक्षण घेतले. मोकळ्या वेळात महिलांनी रद्दीपासून बनवलेल्या कागदी पिशव्या या शेखर चिंचवडे युथ फौंडेशनच्या माध्यमातून ‘प्लॅस्टिक पिशवी टाळा, पर्यावरण वाचवा’ या मोहिमेसाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात देण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या बचतगट महासंघाच्या आशा चिंचवडे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड