विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: April 27, 2017 04:59 IST2017-04-27T04:59:28+5:302017-04-27T04:59:28+5:30
ताथवडेतील अनिकेत भीमराव सरोदे (वय १६) या विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल काय असेल, या चिंतेत

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
वाकड : ताथवडेतील अनिकेत भीमराव सरोदे (वय १६) या विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल काय असेल, या चिंतेत असताना, आलेल्या नैराश्येतून साडीच्या साहाय्याने घरात
छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ताथवडे येथील शनी मंदिरामागे शिंदे चाळीत अनिकेत राहत होता. अनिकेतने यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. त्याचे आईवडील मजुरीचे काम करतात. ते कामासाठी बाहेर गेले होते. घरी कोणी नसताना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. (वार्ताहर)