पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: October 19, 2016 15:12 IST2016-10-19T14:20:15+5:302016-10-19T15:12:25+5:30
थेरगाव येथील पंचशील कॉलनी येथे पोलिस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. १९ - थेरगाव येथील पंचशील कॉलनी येथे पोलिस हवालदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली असून रात्री उशीरा पर्यंत आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
तानाजी बनसोडे ( वय ५७ ) या पोलिस हवालदाराने आत्महत्या केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनसोडे हे निगडी प्राधिकरण कार्यालयात कार्यरत होते. आज सायंकाळी साडेदहाच्या सुमारास ड्यूटी संपवून घरी आले होते.
घरातील सदस्य घराबाहेर गप्पा मारत बसले असताना ते एकटेच जेवायला बसले. जेवताना अचानक दार लावून त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या मागे पत्नी मुले, मूली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे