नैराश्यातून पेटवून घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: April 16, 2017 03:59 IST2017-04-16T03:59:08+5:302017-04-16T03:59:08+5:30
विकासनगर (किवळे) येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका इसमाने नैराश्यातून स्वत:ला जिवंत पेटवून घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी त्याने दोन वेळा

नैराश्यातून पेटवून घेऊन आत्महत्या
देहूरोड : विकासनगर (किवळे) येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका इसमाने नैराश्यातून स्वत:ला जिवंत पेटवून घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी त्याने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
विक्रम अशोक जाधव (वय ४०, रा. नवनाथ कॉलनी, विकासनगर, किवळे) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून, तो रंगाऱ्याचे काम करीत होता.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम जाधव हा पेंटिंगचे काम करीत होता. काही दिवसांपासून पेंटिंगचे काम हातातून गेल्याने विक्रमला व्यसन जडले होते. व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. व्यसनाधीन आणि घडलेल्या घटनांमुळे नैराश्यमय झालेल्या विक्रमने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. काही दिवसांपूर्वी विक्रमने एकदा औषध घेऊन तर दुसऱ्यांदा पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. (वार्ताहर)