शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाअभावी दमछाक; पण गंभीर गुन्हे आणले नियंत्रणात : पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 13:00 IST

लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी, गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन वर्षे पूर्ण

 नारायण बडगुजर-पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोनाच्या संकटाने कमी मनुष्यबळामुळे थोडीफार दमछाक झाली. असे असतानाही लाँकडाऊनची कडक अंमलबजावणी करुन संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दलाने प्रयत्न केले. आयुक्तालयाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याशी साधलेला संवाद.

कम्युनिटी पोलिसिंगवर आपला भर होता. त्याविषयी काय सांगाल? पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राज्यातील तसेच परराज्यातील कामगार, मजूर, नोकरदार वर्ग, विद्यार्थी यांच्यासह उच्चभ्रू वसाहती आहेत. त्यामुळे या सर्वांचे राहणीमान, गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कम्युनिटी पोलिसिंगचा निर्णय घेतला होता. पोलीस काका, पोलीस दीदी, बडीकॉप त्याचाच एक भाग आहे. सुरुवातीच्या काळात त्यामुळे नागरिकांना मदत उपलब्ध झाली. मात्र कोरोना महामारीमुळे असे पोलिसिंग थांबले. लॉकडाऊनमध्ये विशेष पथके रद्द करून बंदोबस्तावर भर दिला.

लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे?आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करावे लागते. नियमित काम जास्त असतानाही पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. मात्र, त्याचा पोलिसांवर अतिरिक्त ताण पडणार नाही, याची काळजी घेतली. तसेच बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, होमगार्ड उपलब्ध झाल्या.

पोलिसांना संसर्ग होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या? लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पोलीस आणि नागरिक यांच्या थेट संपर्काचे प्रमाण वाढले. त्यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण झाली. मात्र, खबरदारीच्या सूचना दिल्या. आरोपीला ताब्यात घेताना तसेच इतर कारवाई दरम्यान सुरक्षा साधनांचा वापर केला. ५५ वर्षांवरील वयाच्या पोलिसांना कामातून सवलत दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त