शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमध्ये घरबसल्या मिळणार प्रमाणपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:54 IST

विद्यार्थांनी विविध दाखले व प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय, महा ई सेवा केंद्र येथे गर्दी करण्याची गरज नाही..

ठळक मुद्देऑनलाइन सुविधा : पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून व्यवस्था

पिंपरी : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार पिंपरी - चिंचवड कार्यालयाने हे दाखले घरबसल्या आॅनलाईन मिळण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी आपले सरकार या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहेत.https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en  या वेबसाईटवर माहिती व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच  https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html?m=1  ही वेबसाईट पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. कशाप्रकारे अर्ज दाखल करावा यासाठी या वेबसाईटवर व्हिडीओ दिला आहे. नागरिकांना प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तसेच ३९ महा ई सेवा केंद्र आणि नागरिक सुविधा केंद्र आकुर्डी यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. अर्ज भरण्यास काही अडचण आल्यास आपल्या घराजवळील महा ई सेवा केंद्र अथवा नागरिक सुविधा केंद्रांना संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करता येणार आहेत. 

विद्यार्थांनी विविध दाखले व प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय, महा ई सेवा केंद्र येथे गर्दी करण्याची गरज नाही, असे तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले.  

महत्त्त्वाच्या सूचना * अर्ज इंग्रजी व मराठीतच भरावा.* इंग्रजी व मराठीतील नाव तपासल्यानंतरच अर्ज सबमिट करावा. * मूळ कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून पाठवणे. * काही अडचण असल्यास अप्पर तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.

............................

हे दाखले मिळतील ऑनलाइन* उत्पन्नाचा दाखला* वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमासाईल)* रहिवाशी दाखला* जातीचा दाखला* नॉन क्रिमिलिअर/ उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला* ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे प्रमाणपत्र

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसcollegeमहाविद्यालय