प्रवेश प्रक्रियेच्या घोळामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात
By Admin | Updated: July 11, 2015 04:44 IST2015-07-11T04:44:22+5:302015-07-11T04:44:22+5:30
अकरावी प्रवेशाचा घोळ सुटत नसल्याने विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहे. दहावीचा निकाल लागून महिना उलटला, तरी हजारो मुलांना अकरावीमध्ये

प्रवेश प्रक्रियेच्या घोळामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात
पिंपरी : अकरावी प्रवेशाचा घोळ सुटत नसल्याने विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहे. दहावीचा निकाल लागून महिना उलटला, तरी हजारो मुलांना अकरावीमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पालक संतापले आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात प्रवेश समितीच्या सदस्यांना भेटण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.
अकरावी प्रवेशाची तिसरी यादी गुरुवारी जाहीर झाली. चौथी आणि पाचवी यादी जाहीर होणार आहे. समितीसमोर समस्या मांडण्यासाठी अनेक पालक मुलांना घेऊन गरवारे महाविद्यालयात आले होते. प्रवेशाचे निर्णय लवकरात लवकर घ्या, अशी मागणी पालकांनी केली. विद्यार्थी व पालक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे काही काळ कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. ‘तुमच्या मुलाचा नंबर कुठे लागेल हे आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही पुढच्या यादीची वाट पहा.’ असे सांगण्यात आले. आॅनलाइन प्रवेशामुळे विद्यार्थ्यांचे नंबर कोणत्याही शाळा, महाविद्यालयात लागत आहेत. हे पालकांना मान्य नसल्यामुळे आपल्या मुलाला चांगल्या, घराजवळ असणाऱ्या योग्य वाटेल त्याच शाळेत प्रवेश मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी पालकांना नोकरी-धंदा सोडून सारखे हेलपाटे मारावे लागत आहेत. अर्ज भरताना अनुदानित शाळेचा क्रमांक निवडला होता. नंबर विनाअनुदानित शाळेत लागल्याच्या तक्रारी अनेक पालक करत होते. (प्रतिनिधी)