जुन्या भांडणावरून महिलेस मारहाण

By Admin | Updated: January 10, 2017 03:00 IST2017-01-10T03:00:38+5:302017-01-10T03:00:38+5:30

येथील एमबी कॅम्प भागातील एका विवाहित महिलेस जुन्या भांडणावरून मारहाण केल्यामुळे देहूरोड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Struggling woman over old quarrel | जुन्या भांडणावरून महिलेस मारहाण

जुन्या भांडणावरून महिलेस मारहाण

देहूरोड : येथील एमबी कॅम्प भागातील एका विवाहित महिलेस जुन्या भांडणावरून मारहाण केल्यामुळे देहूरोड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजेश्वरी वेल्लू (रा. एमबी कॅम्प, देहूरोड ) असे फिर्याद दाखल केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुब्रह्मण्यम अमवसे, राक्या राजू, तडीरसन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ७ जानेवारी) सकाळी दहा वाजता राजेश्वरी वेल्लू यांच्या घरी आलेल्या वरील तिघांनी तुझे पती कुठे आहेत, असा जाब विचारात सुब्रह्मण्यम अमवसे याने वेल्लू यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारला. त्यात वेल्लू जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Struggling woman over old quarrel