पत्ता न सांगितल्याने मारहाण; २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:20 IST2018-09-21T01:20:45+5:302018-09-21T01:20:56+5:30
पत्ता विचारला, प्रतिसाद दिला नाही म्हणून बालाजीनगर येथे एका टोळक्याने तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

पत्ता न सांगितल्याने मारहाण; २ जखमी
पिंपरी : पत्ता विचारला, प्रतिसाद दिला नाही म्हणून बालाजीनगर येथे एका टोळक्याने तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तर तरुणाच्या चुलत बहिणीच्या पायावर सत्तुरने वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी एमआयडीसी भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टीत घडली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उस्मान हुसेन शेख (वय ४०, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय दुनघव, पवन शिरसाठ, आकाश शिरसाठ, चिंग्या, तम्मा, बाळ्या व अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आठ-दहा जणांचे टोळके बालाजीनगरमध्ये आले. त्यांनी उस्मान यांच्या पुतण्याला त्याच्या मित्राच्या घरचा पत्ता विचारला. त्याने प्रतिसाद दिला नाही, या कारणावरून टोळक्याने त्याला मारहाण केली.