शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचा-यांवर हल्ला करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:04 IST

सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत.

ठळक मुद्देशासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार

पिंपरी : महापालिकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा बसावा म्हणून राजपत्रित अधिकारी महासंघाने प्रयत्न केले होते. त्यानुसार राज्य सरकारने भारतीय दंडविधानाच्या कलमात सुधारणा केल्या आहेत. याबाबतचे आदेश सात जूनला दिले आहेत. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.  सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेत गेल्या सहा महिन्यांत दोन प्रकार घडले आहेत. निगडीतील एका नगरसेवकांने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले होते. भारतीय दंडविधान कलम ३३२, ३५३ अन्वये दाखल होणारे खटले यापुढे दखलपात्र, अजामीनपात्र झाले असून ते सत्र न्यायालयात चालविले जाणार आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाने भारतीय दंडविधान आणि  दंडप्रक्रिया संहितेच्या कलमांमध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने  प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.  महापालिकेचे मुख्य लेखापाल व राजपत्रित अधिकारी महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य राजेश लांडे म्हणाले, कलमामध्ये सुधारणा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होता. आता यामध्ये बदल केले आहेत. या बदलामुळे भारतीय दंडविधानाच्या कलम ३३२ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापूर्वी तीन वर्षे शिक्षेची तरतूद होती. तसेच कलम ३५३ खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे. हल्ल्यांच्या घटनांना आळा बसणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारEmployeeकर्मचारी