पिंपरीत मारहाणीमुळे तणाव

By Admin | Updated: February 2, 2017 03:56 IST2017-02-02T03:56:00+5:302017-02-02T03:56:00+5:30

दुकानातून खरेदी केलेला कमरेचा पट्टा बदलून दिला नाही म्हणून २० ते २५ जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने दुकानदार आणि कामगारांना बेदम मारहाण केली.

Stress due to rampage in the camp | पिंपरीत मारहाणीमुळे तणाव

पिंपरीत मारहाणीमुळे तणाव

पिंपरी : दुकानातून खरेदी केलेला कमरेचा पट्टा बदलून दिला नाही म्हणून २० ते २५ जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने दुकानदार आणि कामगारांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपरी कॅम्पात घडली. या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी कॅम्पातील दुकाने बंद केली त्यानंतर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
पिंपरी कॅम्पातील गेलार्ड चौकात राज स्टोअर्स या नावाने विविध वस्तू विक्रीचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पट्टा बदलून घेण्यासाठी काही जण दुकानात आले. बदलून देण्याच्या मुद्यावरून त्यांच्यात वाद झाला. ग्राहकाने साथीदारांना बोलावून घेतले. मोटारीतून आलेले टोळके दुकानातील कामगारांना आणि दुकान मालकाला दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे गोंधळ उडाला. काहींनी दुकानावर दगडफेक केली. थोड्या वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यास दुकान उघडण्यास सांगितले. पोलिसांनी दुकान उघडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करेपर्यंत कॅम्पातील अन्य दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. (प्रतिनिधी)

Web Title: Stress due to rampage in the camp