‘शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा’
By Admin | Updated: November 16, 2016 02:21 IST2016-11-16T02:21:36+5:302016-11-16T02:21:36+5:30
केंद्र सरकारने नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे धोरण बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी घेतल्याचे

‘शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा’
पिंपरी : केंद्र सरकारने नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे धोरण बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी घेतल्याचे दिसत आहे.
शासन शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. असे सांगत असतानादेखील व्यापारी शेतकऱ्यांना सहकार्य करीत नाही. तरी आपल्या नियंत्रणाखालील व्यापाऱ्यांना आपण तातडीने आदेश देऊन, शेतकऱ्यांची अडवणूक थांबविण्याची मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे सदस्य विलास कुटे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)