डोक्यात दगड घालून खून

By Admin | Updated: April 26, 2017 03:50 IST2017-04-26T03:50:16+5:302017-04-26T03:50:16+5:30

रायवूड पार्क कॉलनी लोणावळा येथे राहणारे अनिरुद्ध नालकर (वय ४८, मूळ राहणार जालना. सध्या राहणार रायवूड पार्क लोणावळा) हे सोमवारी रात्री

Stone stones on your head | डोक्यात दगड घालून खून

डोक्यात दगड घालून खून

लोणावळा : रायवूड पार्क कॉलनी लोणावळा येथे राहणारे अनिरुद्ध नालकर (वय ४८, मूळ राहणार जालना. सध्या राहणार रायवूड पार्क लोणावळा) हे सोमवारी रात्री आरोपी यांच्या पत्नीशी बोलत बसले होते. हा राग मनात धरत व बायकोवर संशय घेत आरोपी राजू राघू सदावर्ते (वय ३५, मूळ राहणार सावरगाव भागडे, पो. शेवली, जि. जालना. सध्या राहणार रायवूड पार्क कॉलनी लोणावळा) याने अनिरुद्ध हे झोपेत असताना मध्यरात्री त्यांच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी घणाने घाव घालत त्यांचा खून करून पलायन केले. घटनेची माहिती समजताच अवघ्या दोन तासांत लोणावळा शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील काही कामगार रायवूड पार्क येथे राहतात. मयत अनिरुद्ध व आरोपी राजू सदावर्ते हे एकाच गावातील असून रायवूड पार्क कॉलनी येथे शेजारीच राहतात.
मयत अनिरुद्ध व आरोपी याची पत्नी रात्री गप्पा मारत बसले होते. याचा राग मनात धरत व स्वत:च्या पत्नीवर संशय घेत मध्यरात्री आरोपी राजू याने दारूच्या नशेत अनिरुद्ध याच्या डोक्यात लोखंडी घणाने घाव घालत त्याचा खून केला.
घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व लोणावळा शहरच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने आरोपीला अटक केली. (वार्ताहर)

Web Title: Stone stones on your head