शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत वाहनांवर दगडफेक करणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:35 IST

विद्यानगर येथे उभ्या केलेल्या ट्रकच्या काचा फोडून ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्यास मारहाण  करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

पिंपरी : विद्यानगर येथे उभ्या केलेल्या ट्रकच्या काचा फोडून ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्यास मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. अमित बाबर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीन शेख, सागर झोरबाडे, सुग्रीव काळे, अजय बारसकर, दिपक गिरी या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाहनांवर दगडफेक घडल्याचा प्रकार गुरूवारी रात्री घडला होता. विद्यानगरजवळील मोकळ्या जागेत काहीजण मद्यप्राशन करीत बसले असल्याची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. तातडीने पोलीस घटनास्थळी आले. त्यावेळी मद्यपींनी तेथून पलायन केले होते. आजुबाजुला कोणीच नव्हते. केवळ ट्रक उभे होते. या ट्रकजवळ चालक आणि क्लिनर थांबलेले होते. त्यांनीच पोलिसांना माहिती दिली असावी, असा समज झालेल्यांनी ट्रकवर दगडफेक करून काच फोडली. तसेच ट्रकजवळ थांबलेल्या राजेशकुमार साह आणि परमेवर श्रीमल साव या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ट्रकचालक, क्लिनर यांना मारहाण आणि वाहनाचे नुकसान केल्याबद्दल अमित बाबर यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या फिर्यादीची दखल घेवुन पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी आजुबाजुच्या परिसरात चौकशी केली असता, दत्तनगर, शंकरनगर परिसरात चार आणि चिखली परिसरात एक असे पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. बहुतांशी आरोपी दत्तनगर, शंकरनगर परिसरात राहणारे असून एक आरोपी मात्र चिखली मोरेवस्ती येथे राहणारा आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक