तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक

By Admin | Updated: February 17, 2017 05:02 IST2017-02-17T05:02:48+5:302017-02-17T05:02:48+5:30

तडिपारी आदेशाचा भंग करून शहरात वावरत असलेल्या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलासह जेरबंद

The stolen punk caught with the pistol | तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक

तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक

पिंपरी : तडिपारी आदेशाचा भंग करून शहरात वावरत असलेल्या गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलासह जेरबंद केले. ही कारवाई चिंचवड, वेताळनगर येथे करण्यात आली.
रणजीत बापू चव्हाण (वय २४, रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर परिमंडळ तीनच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो फरार आरोपी होता. त्याला चिंचवड पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही तडीपार गुंड शहरात वावरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस तसाप करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The stolen punk caught with the pistol