शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

स्टिंग ऑपरेशन - उद्योगनगरीत राजरोसपणे बेकायदा गॅस रिफिलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 1:35 PM

गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने रिफिलिंग करताना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही

ठळक मुद्देप्रशासनाचा कारवाईचा फार्स : दुर्घटना घडूनही अधिकाऱ्यांचा कानाडोळा* दुरुस्तीच्या नावाखाळी रिफिलिंग, एक हजाराकरिता जीव धोक्यात 

मंगेश पांडे पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या राजरोसपणे अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंगचा उद्योग सुरू आहे. यातून मोठ्या दुर्घटना घडत असतानाही हे रॅकेट चालविणाऱ्यांवर परिमंडळ कार्यालयाकडून कठोर कारवाई होताना दिसत नाही. केवळ कधीतरीच एखाद्या दुकानावर कारवाई करून फार्स  केला जातो. अशाप्रकारे बेकायदारीत्या उद्योग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने रिफिलिंग करताना दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही धोकादायक पद्धतीने हा उद्योग केला जात आहे. चिखली, कुदळवाडी, भोसरी, पिंपरी, रहाटणी, निगडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड आदी भागांत अशाप्रकारे सर्रासपणे गॅस रिफिलिंग केले जाते. मात्र, परिमंडळ कार्यालयाच्या अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष केल्..........* दुरुस्तीच्या नावाखाळी रिफिलिंग, एक हजाराकरिता जीव धोक्यात अनेकजण अधिकृत गॅस वितरकाकडून घरगुती वापराचा १४ किलो २००ग्रॅमचा गॅस सिलिंडर घेत नाहीत. केवळ पाच किलो गॅस मावेल या आकाराचे रिकामे सिलिंडर घेतले जातात. या सिलिंडरमध्ये गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानांसह भांड्याच्या दुकानांमध्ये बेकायदारीत्या गॅस भरून दिला जात आहे.  गॅस रिफिलिंग रॅकेट चालविणारे त्यांना या छोट्या आकाराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देतात. या बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्रांवर अत्यंत ज्वलनशील असलेला गॅस धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये भरला जातो. एक प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार सध्या शहरात सुरू आहे. .........गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांकडून नऊशे ते एक हजार रुपयांना गॅस सिलिंडर घेतला जातो. त्यानंतर दीडशे रुपये किलोप्रमाणे छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदारीत्या गॅस भरून देतात. त्यामुळे त्यास १४ किलोच्या गॅसमधून प्रतिकिलो दीडशे रुपयांप्रमाणे गॅसची विक्री केल्यास २ हजार १०० रुपये मिळतात. हे जादा पैसे मिळविण्यासाठी अनेकजण जीव धोक्यात घालून हा उद्योग करीत असल्याचे समोर आले आहे.....शहरात स्फोटाच्या तीन घटना चिखली येथे अडीच वर्षांपूर्वी अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करीत असताना स्फोट झाला होता. यामध्ये सिलिंडर उंच हवेत उडून डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या वेळी लागलेल्या आगीत आजूबाजूच्या दुकानांचेही नुकसान झाले. यासह ९ एप्रिल २०१९ ला देखील वाकड रोड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी येथील एका दुकानात गॅॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडून त्या दुकानासोबतच बाजूला असणाऱ्या झोपड्यांना आग लागली. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCylinderगॅस सिलेंडर