शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

स्टेडिअमचे झाले गोदाम; छताला चिरे, आसन व्यवस्थेची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:18 AM

छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे.

पिंपरी : छतावरील पत्र्याला चिरा पडलेल्या... आसनव्यवस्थेची दुरवस्था... मैदानावर वाढलेले गवत अन् अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आहे. अशी दुरवस्था नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची झाली आहे. औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख व्हावी. तसेच विविध खेळांमध्ये स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी याकरिता महापालिकेकडून प्रशस्त क्रींडागणे उभारण्यात आली. नेहरुनगर येथे याच धोरणाअंतर्गत अण्णासाहेब मगर स्टेडियम उभारणी करण्यात आली. या क्रीडांगणवर विविध खेळाडू सराव करुन अनेक जिल्हास्तरीय ते आतंरराष्ट्रीय, स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले. मात्र, सध्या पालिक ा प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे स्टेडियम आहे की गोदाम असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.खेळाडूंसाठी ठरले वरदान१९७५ रोजी कामगार कल्याण मंडळाच्या वतीने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने एकूण ५००० आसन क्षमता असलेले मगर स्टेडियम पाच एकर जागेत बांधण्यात आलेले आहे. विविध क्रीडा प्रकारांचा विचार करुन मैदान बांधले गेले. अनेक खेळाडूंसाठी हे मैदान वरदान ठरले आहे. आजतागायत विविध शालेय तसेच व्यावसायिक स्पर्धा या मैदानावर झाल्या आहेत. यातून कोट्यावधीचा निधी पालिकेस प्राप्त झाला. मात्र, या निधीतून स्टेडियमची वेळोवेळी देखभाल करण्याचा क्रीडा विभागास विसर पडलेला दिसून येतो.३१ आॅगस्टपासून जिल्हास्तरीय स्पर्धायाच मैदानावर ३१ आॅगस्ट पासून जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर दरम्यान या मैदानावर क्रिकेट, शुटिंगबॉल, व्हॉलीबॉल या सारख्या मैदानी खेळाचा समावेश आहे. या निमिताने अनेक खेळाडू, प्रेषक या ठिकाणी येणार आहेत. पण स्टेडियमची सध्याची अवस्था पाहता खेळाडू, प्रेक्षक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होतो. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असणार ? हा सवाल उपस्थित होत आहे.भंगाराचे गोदामस्टेडियमच्या प्रवेशाव्दारातून प्रवेश करताच समोर अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्याचे ढीग पहायला मिळतात. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेले साहित्य या मैदानात आणून टाकले आहे. त्यामुळे हे खेळाचे स्टेडियम आहे की भंगाराचे गोदाम असा खेळाडूंना प्रश्न पडतो.लोखंडी कठडेही कमकुवतस्टेडियमच्या बांधकामाची अवस्थादेखील भयावह झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतीना चिरा पडलेल्या आढळून आल्या. भिंतीवरील प्लॅस्टर निघत आहे. त्यामुळे आतील लोंखडी गज स्पष्ट दिसून येतात. स्टेडियममधील आसनव्यवस्था अस्वच्छ झालेली दिसते. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडेही कमकुवत झाले आहेत. या कठड्यांवर जोर देऊन उभा राहिल्यास तोल जाऊन दुर्घटना घडू शकते. छतावरील पत्रे अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात. गेटच्या शटरचे लोखंडी पत्रे तुटलेल्या अवस्थतेत आहेत.नोटिशीनंतरही नूतनीकरणाकडे दुर्लक्षयाच स्टेडियम मध्ये क्रिडा ग्रंथालय, निवडणूक विभागाचे कार्यालय , मैदान बुकिंग कार्यालय असून या मोडकळीस आलेल्या स्टेडियममुळे तेथील कार्यालयांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिका प्रशासनाला मागील वर्षी कळविले असून यासंदर्भात नोटीस आली असून अद्याप या स्टेडियमचे नूतनीकरण सुरू झालेले नाही.मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वावरमैदानावर अनेक भटक्या कुत्रांचा वावर सध्या वाढलेला आहे. मैदानावर सांयकाळी अनेक लहान मोठे खेळाडू सरावासाठी येत असतात. सरावाच़्या वेळी धावत असताना ही कुत्रे खेळाडूंच्या मागे धावतात, तर कधी अंगावर धावून येऊन भुंकू लागतात. परिणामी अनेक खेळाडंूनी धावणे बंद केलेले आहे. या संदर्भात तक्रार देऊनही या कुत्र्यांचा अद्याप बंदोबस्त करण्यात आला नाही आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार