अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By Admin | Updated: August 10, 2015 02:49 IST2015-08-10T02:49:18+5:302015-08-10T02:49:18+5:30

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात मासिक सभा घेऊन त्याचा फायदा काय? या सभेत झालेल्या ठरावावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसेल,

The spread of the officials took place | अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

रहाटणी : ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात मासिक सभा घेऊन त्याचा फायदा काय? या सभेत झालेल्या ठरावावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसेल, तर सभा घ्यायची कशाला? संबंधित विभागाचे अधिकारीच उपस्थित राहत नसतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयुक्तांना निवेदन द्यावे लागेल. काही अधिकारी सभेत फक्त ऐकून घेण्याचे काम करतात. मात्र, झालेल्या ठरावावर अंमलबजावणी करीत नाहीत, असा संतप्त सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी मासिक सभेमध्ये उपस्थित केला.
प्रभागातील रखडलेली कामे, मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, अनेक समस्या सोडविण्यासाठी अधिकारी कामचुकारपणा करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत नगरसेवकांनी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सध्या शहरात अनधिकृत बांधकामाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. अनेक नागरिक नळजोडणीसाठी अर्ज करीत आहेत. मात्र, तांत्रिक अडचणी पुढे करून अर्जावर कोणतीही कारवाई न करता तसेच ठेवले जात आहे. मात्र, नागरिक विनापरवाना नळजोडणी करीत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. अधिकारी यावर कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचा सवाल नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी उपस्थित केला.
सध्या संध्याकाळी पालिकेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी रात्री ८ वाजेपर्यंत कामावर असतात. जर त्यानंतर एखादी अडचण निर्माण झाली, तर तक्रार कोणाकडे करणार, की नागरिकांनी रात्रभर अंधारात राहायचे? असा सवाल नगरसेवक कैलास थोपटे यांनी उपस्थित केला. घरोघरी जाऊन कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी, कुत्र्यांचा उच्छाद असा एक ना अनेक तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचला. (वार्ताहर)

Web Title: The spread of the officials took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.