शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'पुरोगामी' विचारधारेला फाटा; पिंपरीत विरोधी पक्षनेत्याने पदभार स्वीकारताना केली 'श्रद्धेने' पूजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 13:55 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ यांची बुधवारी विरोधी पक्षनेतेपदी लागली वर्णी

पुणे (पिंपरी) : राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा पक्ष मानला जातो. स्वतः शरद पवार त्या विचारांचे अनुकरण करणारे आहेत. मात्र,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागलेल्या राजू मिसाळ यांनी चक्क पक्षाच्या पुरोगामी विचारसरणीलाच फाटा दिला. विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपल्या कार्यालयातच पूजा केली. आणि यापुढचा धक्कादायक प्रकार म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात देखील अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ यांची बुधवारी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पूजेचा विधी करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी पूजेसाठी आणि त्यांच्या अभिनंदनासाठी पालिकेत हजेरी लावली होती. कोरोनाच्या धर्तीवर लग्न समारंभांना देखील मनुष्य संख्येची मर्यादा आहे. मात्र,अनेक कार्यकर्ते पूजेलाच नव्हे,तर अभिष्टचिंतन करण्यासाठी गटा गटाने येत होते. काही पुष्पगुच्छ घेऊन येत होते तर, काहींनी केक कापून आनंद साजरा केल्याचे चित्र पालिकेत दिसत होते.राष्ट्रवादी पक्ष पुरोगामी मानला जातो. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी पूजा बांधल्याची चर्चा पालिकेमध्ये होती.  

पिंपरी -चिंचवड महानगर पालिकेमध्ये बुधवारी नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पूजा केली. त्याला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.शहराला कोरोनापासून मुक्ती द्यावी, या भावनेने एक भक्त म्हणून पूजा घातल्याची प्रतिक्रिया मिसाळ यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.  मिसाळ म्हणाले, पिंपरी चिंचवड मोरया गोसावीचे शहर म्हणून ओळखले जाते. मी गणेश भक्त असल्याने गणेशाची पूजा केली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरवासियांना कोरोनापासून मुक्त कर अशी प्रार्थना करण्यासाठी पूजा केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार