शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 01:11 IST

महापालिकेकडून १६० जणांवर कारवाई : सर्व प्रमुख रस्त्यांवर कारवाई तीव्र करणार

पुणे : शहरात प्रवास करताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा पायी चालताना रस्त्यांवर थुंकणे आता तल्लफबाजांना चांगलेच महागात पडणार आहे. महापालिकेच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत आत ही मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या आठ दिवसांत अशा प्रकारे रस्त्यांवर थुंकणाऱ्या १६० लोकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे शहरातील सर्व रस्ते, चौकांमध्ये ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानातंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शासनाने प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने नुकतेच याबाबत करण्यात येणाºया दंडाचे निवेदन जाहीर केले आहे. यापुढील ही कारवाई नियमितपणे व सातत्याने करण्यात येणार आहे. सुरुवातील रस्त्यांवर थुंकणाºयांवर कारवाई करण्यात येत असून, पुढील काळात सार्वजनिक इमारतींमध्ये घाण करणाºयांवरदेखील कारवाई करण्यात येणार असल्योच मोळक यांनी स्पष्ट केले.शहरातील तल्लफ बहाद्दरांवर गेल्या आठ दिवसांपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली जात आहे. गेल्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांवर थुंकणाºया १६० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये केवळदंड न करता थुंकलेली जागा संबंधित व्यक्तींकडून साफदेखील करून घेण्यात येत आहे.- ज्ञानेश्वर मोळक, महापालिका घनकचरा विभाग प्रमुख 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान