शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोन वगळून उद्योगांना लवकरच परवानगी : श्रावण हर्डीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 22:11 IST

महापालिका हद्दीतील कंपन्या अटी शर्थीवर सुरू करण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देपिंपरी चिंचवड शहरातील उद्योग सुरू करण्याबाबत महापालिका भवनात शनिवारी दुपारी बैठक

पिंपरी : कोरोना लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवडएमआयडीसीतील हजारो उद्योग बंद आहेत. ते सर्व उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात महापालिका हद्दीत नॉन ''कंटेन्मेन्ट झोन'' मधील असलेले उद्योग सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग सुरू करण्याबाबत महापालिका भवनात शनिवारी दुपारी बैठक झाली. या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उद्योजक विनोद बन्सल, बालाजी अय्यर आदी या वेळी उपस्थित होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य उद्योग सचिव भूषण गगराणी यांना पिंपरी -चिंचवड परिसरातील नॉन कंटेन्मेंट झोनमधील उद्योग सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मंगळवारपर्यंत (दि. १२) महाराष्ट्र शासनाकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात येथील उद्योग सुरू करण्यास परवानगी देता येईल. महापालिका परिसर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे येथील उद्योग चालू करण्यासाठी स्वतंत्र नियमावली व अर्ज करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप व पोर्टल तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्यानंतर उद्योजकांनी आपले अर्ज या अ‍ॅ प किंवा पोर्टलवर सादर करावेत. उद्योग सुरू केल्यानंतर सर्व नियम व अटींचे पालन उद्योजकांनी करावे. आयुक्त हर्डीकर यांना या वेळी उद्योजकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.  चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती आणि शिक्रापूर परिसरातील उद्योग सुरू करण्यात आले. मात्र, पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योग बंदच आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. शहर परिसरातील सात ते आठ हजार एमएसएमई लघुउद्योजक वाहन व इतर सुट्या भागांचे पुरवठादार आहेत. जगभरात तसेच देश व राज्यातील विविध भागात मोठ्या उद्योगांना त्यांच्याकडून पुरवठा केला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील उद्योग बंद असल्यामुळे त्यांच्याकडील काम जाण्याची शक्यता आहे. कामगारसुद्धा इतरत्र कामासाठी जाण्याची सुरुवात केली आहे. उद्योग सुरू करण्यास आणखी विलंब झाल्यास अनेक उद्योग कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती संदीप बेलसरे यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMIDCएमआयडीसीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर