सोमनाथ तापकीरांच्या शिट्टीचा आवाज घुमतोय

By Admin | Updated: February 17, 2017 04:51 IST2017-02-17T04:51:06+5:302017-02-17T04:51:06+5:30

प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्गाचे अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांचा प्रचार सुरू आहे. प्रभागात पदयात्रा,

Somnath thermal shouting sound roaming | सोमनाथ तापकीरांच्या शिट्टीचा आवाज घुमतोय

सोमनाथ तापकीरांच्या शिट्टीचा आवाज घुमतोय

रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्गाचे अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांचा प्रचार सुरू आहे. प्रभागात पदयात्रा, कोपरा सभा, वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपली निशाणी शिट्टीला पसंती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या शेकडो तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक शिट्टीचा आवाज करीत तापकीर यांना साथ देण्याची विनंती मतदारांना करीत आहेत. या प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तरुण, तडफदार, अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनाच साथ देण्याचे आवाहन केले आहे.
तापकीर हे तरुण तडफदार व सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये मिसळणारे उमेदवार असल्याने त्यांना प्रभागात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना प्रभागात अनेक विधायक कामे केली. या प्रभागाची चांगल्या प्रकारची जण असणारे ते एकमेव तरुण उमेदवार आहेत. या तरुण, तडफदार उमेदवाराच्या मागे तरुणांची मोठी फळी असून रात्रंदिवस समाजासाठी काही तरी करण्याची सर्वांची धडपड सुरू असते.
तापकीर म्हणाले, ‘‘अनेक वर्षे येथील नागरिक अनेक समस्यांना सामोरे गेले. अनियमित पाणीपुरवठा व विद्युतपुरवठा, वाहतूककोंडी नागरिकांच्या पाचवीला पुजल्या आहेत. मात्र यावर मात करायची असेल, तर मला तुम्ही सर्वांनी साथ द्या. माझी निशाणी चिन्ह शिट्टी
असून यावर आपण विश्वास टाकावा.’’ (वार्ताहर)

Web Title: Somnath thermal shouting sound roaming