शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कधीतरी असंही...एकपात्री प्रयोग आणि सादरकर्ते पिंपरीचे आयुक्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 19:04 IST

महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा होता .

ठळक मुद्देमहापालिकेच्या कार्यक्रमात सनदी अधिकाऱ्यांतील, आयुक्तांमधील एक अभिजात कलावंत

पिंपरी :  महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणाला नेहमी लगाम घालणाऱ्या संयत, शांत स्वभावाचे आणि कोणत्याही प्रश्नावरून चौकशीचे आदेश देण्यात पटाईत असणाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चक्क चिनी के दाम कम करने हमे वोट दे... हा एकपात्री अभिनय अविष्कार सादर केला. त्यास उपस्थितांनी दाद दिली. तसेच महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा धक्का होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेविषयीचा कोणताही प्रश्न आयुक्त हार्डीकर यांना प्रश्न विचारला की ते आपल्या रसाळवाणीने समोर असणाऱ्यांचे तोंड गप्प करतात. एवढे वाक्चातुर्य त्यांच्याकडे आहे. नेहमी धीरगंभीर, कधी हसमुख पण अत्यंत शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख आहे. भोसरीत महापालिकेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी व्यासपीठावर महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते. त्यावेळी आयुक्तांमधील कलावंत शहरवासियांसमोर पुढे आला. संयोजकांनी आयुक्तांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी एकपात्री कलाविष्कार सादर केला. नमस्कार,  भाईयो और बहनों, काका और काकिंयो, दादा और दादियो, अशी आयुक्तांनी सुरूवात केली. आता ते काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. ते म्हणाले, आजकल हमारे देश में महंगाई बहोत बढ गई है. इसका प्रमुख कारण हे लोकसभा. वैसे जडो मे जड खरबुजे के जड बडी होती है. और रंगो मे रंग जर्मनी के रंग पक्के होते. वह जर्मनी की पहले दुसरे वर्ल्ड वॉर मे शामिल हुई थी. अक्सर वार तो बहुत होते. जैसे की,  सोमवार- मंगलवार- बुधवार. शनिवार तो हनुमान जी का वार होता है. वह हनुमानजी की उन्होंने हिमालय से संजीवनी बुटी लाई थी. (हात उंचावून)  तो बोलो जय श्री हनुमान. जो हिमालय, उसके एक और  भारत दुसरी और चीन. चीन मे रहेने वालोंको चिनी कहॉ जाता है. यदी आप चीनी के दाम कम करना चाहते हे, तो कृपा करके हमे वोट दो. यावर उपस्थितांमध्ये हास्य लाट उसळली. सर्वांनी आयुक्तांच्या कलाविष्कारास दाद दिली. महापालिकेच्या कार्यक्रमात सनदी अधिकाऱ्यांतील, आयुक्तांमधील एक अभिजात कलावंत चिंचवडकरांना अनुभवयाला मिळाला.

टॅग्स :Puneपुणेshravan hardikarश्रावण हर्डिकर