शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

....तर माझा ‘वॉच’ तुमच्यावर असेल : आयुक्त मकरंद रानडे यांचा पोलिसांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 19:19 IST

मी तुमचा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणी भिती दाखवली, प्रलोभन दाखवले तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही... 

ठळक मुद्दे१४ आॅगस्टला झालेल्या बेकायदा बदल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्य नाहीवरिष्ठांच्या आदेशाला घाबरून काही तिकडे हजर झाले होते, ते पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये हजर

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यरत होण्याच्या आदल्या रात्री १४ आॅगस्टला पुणे शहरातील काही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेकायदा बदल्या करण्यात आल्या. ही बाब पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत नेमणूक झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पुणे आणि ग्रामीण हद्दीत जाऊ लागले आहेत. प्रशासकीय नियंत्रण पोलीस आयुकत पिंपरी चिंचवड यांच्याकडे असून मी तुमचा प्रशासकीय नियंत्रण अधिकारी आहे, त्यामुळे कोणी धाक, प्रलोभन दाखवले तरीही कोणीही इकडे तिकडे जाऊ नये. असा सज्जड इशारा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी थेट वायरलेसवरून पोलिसांना दिला आहे. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पुण्यात पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पिंपरी चिंचवडसाठी नेमणुक केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्रीत पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी पुणे शहर व ग्रामीण हद्दीत बदली केली. मात्र या बदल्या बकायदा असल्याची बाब त्याचवेळी निदर्शनास आणून दिली. १ आॅगस्ट २०१८ ला जे पोलीस अधिकारी, कर्मचारी ज्या ठिकाणी नेमणुकीस आहेत, ते त्याच ठिकाणी राहतील, असा पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी आदेश दिला होता. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आहे. त्याच ठिकाणी काम करावे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांच्याकडून काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संपर्क साधून, दमबाजी करून पुणे शहर अथवा ग्रामीणकडे येण्यासाठी धमकावले जात आहे. १४ आॅगस्टला झालेल्या बेकायदा बदल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्य नाहीत. पुण्यातील वरिष्ठांनी दूरध्वनीवरून संपर्क साधताच कमकुवत अधिकारी पुण्यात जात आहेत. हे शिस्तीला धरून नाही. मी तुमचा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणी भीती दाखवली, प्रलोभन दाखवले तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. भविष्याची चिंता करण्याचे कारण नाही. ज्यांना पुण्यात जाण्याची इच्छा आहे, त्यांनी तशी विनंती केल्यास विचार करता येईल.  वरिष्ठांच्या आदेशाला घाबरून काही तिकडे हजर झाले होते, ते पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये हजर झाले आहेत. ही चांगली बाब आहे. यापुढे माझ्या परवानगीशिवाय कोणी पुणे शहर अथवा ग्रामीणकडे जाऊ नये. पुणे शहरातील कोणीही अधिकारी तुमच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करू शकत नाहीत. तुम्ही माझ्या  नियंत्रणाखाली आहात. अशा शब्दात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे