शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्मार्ट कार्ड बेवारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 14:29 IST

जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या एसटी प्रवासात सवलत मिळावी यासाठी स्मार्ट कार्ड संकल्पना सुरू

ठळक मुद्देचिंचवडमधील प्रकार, ५५ स्मार्ट कार्ड सापडले रस्त्यावरपरिवहन मंडळाच्या या भोंगळ कारभारावर नागरिक संतप्त शासकीय योजनेत या स्मार्ट कार्ड मुळे जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात ५० टक्के सवलत

पिंपरी -चिंचवड : शासनाच्या योजनांची काठी हातात यावी यासाठी राज्यातील अनेक जेष्ठ नागरिक प्रतीक्षेत असतात.उतारवयात जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मिळणाऱ्या स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभे राहून ही मंडळी कार्डच्या प्रतीक्षेत असतात.मात्र हे स्मार्ट कार्ड रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडल्याचे वास्तव चिंचवडमध्ये समोर आले आहे.परिवहन मंडळाच्या या भोंगळ कारभारावर नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या एसटी प्रवासात सवलत मिळावी या साठी स्मार्ट कार्ड ही संकल्पना सुरू केली.या साठी जेष्ठ नागरिकांची प्रत्येक केंद्रावर झुंबड उडाली. प्रवासात सवलत घेण्यासाठी हे कार्ड महत्वाचे असल्याने नागरिक तासंतास रांगेत उभे राहून अर्ज करीत होते. यासाठी होणारी गर्दी पाहता हे कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती.हे स्मार्ट आपल्या हातात येतील अशी अपेक्षा जेष्ठ नागरिकांना लागली आहे.मात्र चिंचवड गावातील रस्त्यावर ५५ जेष्ठ नागरिकांचे हे स्मार्ट कार्ड अस्तव्यस्त पडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.सागर सुरेश जंजाळे हे शनिवारी सांयकाळी आकुडीर्तून चिंचवड गावाकडे जात असताना चिंचवड वाहतूक शाखा कार्यालयाच्या पुढे काही कार्ड रस्त्यावर अस्तवस्त पडल्याचे निदर्शनास आले.त्यांनी हे सर्व कार्ड जमा केले.हे कार्ड महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात येणारे जेष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड असल्याचे लक्षात आले.हे कार्ड सत्यप्रत असल्याने त्यांनी हे कार्ड चिंचवड पोलीस स्टेशनकडे जमा केले.चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम यांनी याची खातरजमा करून या बाबत संबंधित विभागाशी संपर्क केला.या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड स्थानक प्रमुख पी.व्ही पाटील यांनी संबंधीत कर्मचा?्यांना चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये पाठवून या बाबत खातरजमा केली.हे महत्वाचे स्मार्ट कार्ड असल्याने पोलिसांनी या बाबत दखल घेत ते स्थानक प्रमुखांच्या हावाली केले.शासकीय योजनेत या स्मार्ट कार्ड मुळे जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळते.या साठी हे कार्ड महत्वाचे आहे.मात्र या कार्ड बाबत शासन स्तरावर राबविण्यात येणारी यंत्रणा कुचकामी असल्याचे समोर आले आहे.जेष्ठ नागरिकांचे हे ५५ स्मार्ट गहाळ झाल्याने महामंडळाचा हा कारभार अनागोंदी पद्धतीने होत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.----------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडstate transportएसटी