शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

झोपडपट्टी पुनर्वसनाला गती; लालटोपीनगरला सर्वेक्षण, लाभार्थ्यांची यादी अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 06:07 IST

शासन अथवा महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंतचे पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन झाल्यानंतर मात्र खासगी विकसकांच्या माध्यमातून अशा प्रकल्पांना चालना मिळाली आहे.

पिंपरी : शासन अथवा महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंतचे पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) स्थापन झाल्यानंतर मात्र खासगी विकसकांच्या माध्यमातून अशा प्रकल्पांना चालना मिळाली आहे. लाभार्थींचा काही अंशी स्वहिस्सा आणि उर्वरित निधी विकसकांचा अशा स्वरूपात पिंपरी चिंचवडमध्ये लालटोपीनगर आणि चिंचवड येथील साईबाबा नगरचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सर्वेक्षणानंतर लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच प्रकल्प उभारण्याचे काम सुरू होणार आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेने केंद्र शासनाच्या जेएनयूआरएम योजनेअंतर्गत मिलिंदनगर, अजंठानगर, वेताळनगर, विठ्ठलनगर आदी भागातील झोपडपट्ट्यांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबविला आहे. जेएनयूआरएम योजनेचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे उर्वरित झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. खासगी बांधकाम व्यावसायिक पुढे यावेत. त्यांच्या पुढाकाराने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून पुनर्वसनाचे प्रकल्प साकारले जावेत, असा एसआरए स्थापनेमागील उद्देश आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतपत विकसक या प्रकल्पांसाठी पुढे येत आहेत. खासगी विकसक हा प्रकल्प राबवू शकेल का? अशी शंका नागरिकांच्या मनात असल्याने सुरुवातीला यास विरोध झाला. झापेडपट्टीतील ७० टक्के रहिवाशांची संमती मिळत नाही, तोपर्यंत खासगी विकसकाला प्रकल्पाबाबतचे पुढचे पाऊल टाकता येत नाही. त्यामुळे सुरुवातीला काहींचा विरोध होत असतानाही विकसकाने चिकाटीने लालटोपीनगरचा प्रकल्प हाती घेण्याचे धाडस दाखवले.२००२ च्या जनगननेनुसार झोपडपट्टीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले. झोपडपट्टीत राहात असल्याचे त्यांचे पुरावे तपासण्यात आले. मतदान ओळखपत्र, घराचा फोटोपास व अन्य रहिवासी पुरावे तपासून यादी तयार करण्यात आली. त्यात आवश्यक ते कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर पात्र, अपात्र लाभार्थींची यादी तयार करण्यात आली. रहिवाशांना सूचना, हकरती नोंदविण्याची संधी दिली. दुरुस्त्या करून घेण्यात आल्या. लालटोपीनगर येथील १०२६ झोपडीधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. महिनाभरात अंतिम यादी तयार केली जाणार आहे. आहे त्याच जागी पुनर्वसन होणार असल्याने झोपडीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रक्रियेने वेग घेतल्यानंतर विरोध करणाºयांचा विरोध मावळला आहे. इतरांबरोबर आपल्यालाही हक्काचे घर मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. चिंचवड साईबाबानगर येथील सुमारे २५० झोपड्या आणि लालटोपीनगरमधील सुमारे ११०० झोपडीधारकांना घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.चाळीस हजार हस्तांतरण शुल्कझोपडपट्टीत ज्यांनी झोपडी खरेदी केली आहे. मूळ मालक वेगळा आहे़ त्याच्याकडून ज्यांनी झोपडी खरेदी केली त्यांना पुनर्वसनातील घर मिळावे, अशी अपेक्षा असते. त्यांनाही या योजनेसाठी पात्र ठरविले जाणार आहे. त्यांनी झोपडी २०१२ पर्यंतच्या कालावधीत खरेदी केली असल्याचा कागदोपत्री पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. त्याबरोबर मतदार ओळखपत्र, रहिवाशी दाखला जोडणे आवश्यक आहे. झोपडी खरेदी केलेल्या लाभार्थींनी शासनाकडे ४०हजार रुपये हस्तांतरण शुल्क भरणे आवश्यक आहे. तरच त्यांना पुनर्वसनातील घर मिळू शकणार आहे. त्यामुळे एसआरएच्या सक्षम प्राधिकाºयाकडे हेशुल्क भरावे, असे आवाहन पुण्यातील एसआरए कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.