डीपी चोरीप्रकरणी सहा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:01 IST2017-08-04T03:01:23+5:302017-08-04T03:01:23+5:30

चिखली - कुदळवाडी (ता.हवेली) या परिसरातून इलेक्ट्रिक डीपी चोरीच्या प्रकरणी तळेगावच्या स्थानिक पोलीस पथकाने सहा चोरट्यांना ताब्यात घेतले.

 Six robbed of DP theft | डीपी चोरीप्रकरणी सहा जेरबंद

डीपी चोरीप्रकरणी सहा जेरबंद

तळेगाव दाभाडे : चिखली - कुदळवाडी (ता.हवेली) या परिसरातून इलेक्ट्रिक डीपी चोरीच्या प्रकरणी तळेगावच्या स्थानिक पोलीस पथकाने सहा चोरट्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण परिसरात २४ इलेक्ट्रिक डिपी चोरल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या चोरी प्रकरणील दोन आरोपी अद्यापी फरारी आहेत.
अब्दुल कलाम याकूब शेख, (वय ३३, रा.कुदळवाडी चिखली), जलालुद्दीन रजा मणियार (वय ३२, रा. वासुलीफाटा ता. खेड), रामेशकुमार कल्लू मातब्बर चौहान (वय २२, रा. कुदळवाडी चिखली), कुतूबुद्दीन हसन शेख (वय ३५, रा कुदळवाडी चिखली), नूरमोहमद हबीब शेख, (वय २४ ), अमीरउद्दीन हैतुल्ला शेख (वय २५, दोघे रा. शिवाजीनगर नाशिक, मूळ रा. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी त्यांना वडगाव मावळ न्यायालय हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. ताहीर (पूर्ण नाव माहित नाही रा. कुदळवाडी चिखली), खोड्या (पूर्ण नाव माहित नाही रा.कुदळवाडी चिखली) हे आरोपी फरार आहेत.
तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, तळेगाव एमआयडीसी, लोणीकंद आणि चाकण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक डीपीच्या चोºया केल्याची आरोपिंनी कबुली दिली आहे.

Web Title:  Six robbed of DP theft