शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : वाढ आणि घटीच्या प्रस्तावावर ‘स्थायी’तील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या सह्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:26 IST

- उपसूचनांच्या प्रकरणास वेगळे वळण : ५२ कोटींची देयके थांबविण्याची मागणी

पिंपरी : महापालिकेत नियमबाह्य बिले दिल्याप्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली असून, सत्तारूढ भाजपने आणि विरोधी पक्षाने प्रशासनावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराचे मूळ असणाऱ्या वाढ आणि घट करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीतील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या सह्या असल्याचे उघड झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस उपसूचनांच्या आधारे सुमारे ५२ कोटी रुपयांची देयके नियमबाह्य पद्धतीने अदा केल्याचे उघडकीस आले आहे. यातील मुख्य सूत्रधार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीणकुमार जैन यांची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी होऊ लागली आहे. त्यानुसार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, यासंदर्भातील वाढ आणि घट करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना करांडे यांची सूचक म्हणून आणि योगिता नागरगोजे यांची अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे. मात्र, हा प्रस्ताव स्थायी समिती सभापतींकडे न देताच थेट लेखा विभागाकडे दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या प्रस्तावामागील मुख्य सूत्रधार कोण, याबाबतची चर्चा रंगली आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी जैन यांच्यावर थेट आरोप असल्याने, ते पदावर राहिल्यास चौकशीवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे. जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही आणि सभेचे चित्रीकरण व कागदपत्रांचा मेळ लागत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदारांची सर्व देयके तत्काळ स्थगित करावीत.  - भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP corporators signed off on Pimpri-Chinchwad's irregular bills proposal.

Web Summary : Pimpri-Chinchwad Municipal Corporation faces scrutiny over ₹52 crore in irregular payments. Two BJP corporators signed the controversial proposal. Investigation demanded into chief accounts officer and suspension of payments urged until inquiry concludes.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाMunicipal Corporationनगर पालिका