भावंडांचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: May 3, 2016 03:45 IST2016-05-03T03:45:49+5:302016-05-03T03:45:49+5:30

इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी भोसरी येथे घडली. वैष्णवी किस्त्या राठोड (वय ५) आणि विराट

Siblings drowning death | भावंडांचा बुडून मृत्यू

भावंडांचा बुडून मृत्यू

पिंपरी : इमारत बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी भोसरी येथे घडली. वैष्णवी किस्त्या राठोड (वय ५) आणि विराट किस्त्या राठोड (वय ३ ) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील अय्यप्पा मंदिराजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असून, बांधकामासाठी सुमारे दोन ते तीन फूट खोल पाया खोदला होता. दरम्यान, खड्ड्यात पाणीही होते. जवळच या कामावर काम करणाऱ्या मजुरांची घरे आहेत. तिथेच किस्त्या राठोड (रा. मूळ आंध्र प्रदेश, सध्या रा. भोसरी) वास्तव्यास आहे.
वैष्णवी आणि विराट हे खेळण्यासाठी घरातून बाहेर पडले. बराच वेळ होऊनही मुले दिसत नसल्याने आईने शोध घ्यायला सुरुवात केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही मुले खड्ड्यात आढळून आली. त्यांना तत्काळ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत जाहीर केले.

Web Title: Siblings drowning death