काळेवाडीत शिट्टीचा आवाज

By Admin | Updated: February 14, 2017 02:02 IST2017-02-14T02:02:08+5:302017-02-14T02:02:08+5:30

प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्ग पुरुष या गटातील अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी प्रचार जोरात सुरू असून,

Shouting in Kalewadi | काळेवाडीत शिट्टीचा आवाज

काळेवाडीत शिट्टीचा आवाज

रहाटणी : प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमधील मागास प्रवर्ग पुरुष या गटातील अपक्ष उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी प्रचार जोरात सुरू असून, या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन उमेदवार सोमनाथ तापकीर यांनी केले आहे. मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत शिट्टीच्या चिन्हाला पसंती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. काळेवाडीतील घराघरांत सध्या शिट्टीचा आवाज ऐकू येत आहे.
सोमनाथ तापकीर म्हणाले, ‘‘काळेवाडी हा भागात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या परिसरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून वर्षानुवर्षे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नावर पालिकेत आवाज उठविण्यासाठी मतदारांनी साथ द्यावी. सोमनाथ तापकीर यांच्याकडे विकासाचे व्हीजन आहे. त्यांच्यासारख्या उमेदवारांना निवडून दिले, तर प्रभागाचा विकास
होईल. सोमनाथ तापकीर यांना
विजयी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अनंत कुलकर्णी यांनी
केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Shouting in Kalewadi